निळा केंद्राची 2021-22 शैक्षणिक वर्षातील दुसरी बिटस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

निळा केंद्राची शिक्षण परिषद गोदावरी पब्लिक स्कूल मरळक बु.येथे  अत्यंत उत्साहात,आनंददायी वातावरणात संपन्न झाली.


शिक्षण परिषदेच्या पहिल्या भागामध्ये परिषदेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून सौ. शोभा भारती शिक्षण विस्तार अधिकारी बीट निळा ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून निळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री धोपटे व्ही.एस.,गोदावरी स्कूल चे उपप्राचार्य श्री नितीन हटकर सर उपस्थित होते.तर विषयतज्ञ /सुलभक म्हणून श्रीमती वाघमारे जे.के,धोत्रे मॅडम,राठोड एस. एच.सर,सोनटक्के सर,तंत्रस्नेही श्री दुगाणे सर हे होते.या शिक्षण परिषदेला बीट निळा केंद्रातील 50%  शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.


सर्वप्रथम विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून,प्रतिमेचे पूजन करून परिषदेला सुरूवात करण्यात आली सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले.


यानंतर निळा बिटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ शोभा भारती मॅडम यांनी परिषदेचे प्रास्ताविक करताना शिक्षण परिषदेचा हेतू ,उद्देश,स्वरूप व विषय सहभागी घटक व अपेक्षित उद्देशपूर्ती कथन केली. या परिषदेच्या पहिल्या भागात केंद्रातील पाचवीपर्यंत शाळा आसलेल्या शाळांनी मुलांचे स्कॉलरशिप आणि नवोदय चे फॉर्म भरावेत आणि त्यांचा नियमित सराव घेतवा.असे आवाहन ही केले.



तसेच निळा केंद्रातील काही उपक्रमशील शिक्षक की ज्यांनी शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय कार्यात बहुमूल्य योगदान देऊन आपले अध्यापन कार्य कोरोना काळातही ऑनलाइन /ऑफलाइन पद्धतीने उत्कृष्ट रित्या केले त्या शिक्षकांचा व जे शिक्षक केंद्रात तंत्रस्नेही म्हणून ओळखले जातात त्यांच्याही ज्ञानाचा उपयोग केंद्राला आधार अपडेट,करणे ,संच मान्यता करणे,आधार डुप्लिकेट संख्या कमी करणे,आधार मिस्मॅच कमी करणे,यासाठी फायदा झाल्याचे सांगितले. काही प्रश्यासकीय सूचना देण्यात आल्या.तसेच केंद्रातील काही ऍक्टिव्ह व उत्कृष्ट मुख्याध्यापक  यांच्या कार्याचाही गौरव केला.यानंतर प्रमुख पाहुणे उपप्राचार्य श्री नितीन हटकर सर यांनी ही आम्हाला या परिषदेचे यजमानपद दिल्याबद्दल आभार मनले.केंद्रप्रमुख श्री धोपटे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून परिषदेला शुभेच्छा दिल्या तसेच केंद्रातील शिष्यवृत्ती धारक,उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन उत्कृष्ट शिक्षकांचे अभिनंदन व कृतिशील मुख्याध्यापक यांचे अभिनंदन करून शिक्षण परिषदेच्या पहिल्या भागाच्या शेवटी अशोक सोनटक्के सर यांनी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले व परिषदेचा पहिला भागाची सांगता झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कैलास पोहरे सर सर यांनी  केले.



भाग दुसरा -श्रीमती धोत्रे मॅडम यांनी भाषा विषयाचा 90 दिवसाचा शिक्षण आपल्या दारीं 12 जानेवारी पासून आणि 1 जानेवारी पासून सुरुवात झालेला 100 दिवसाचा वाचन प्रकल्प आणि त्याचे नियोजन याविषयीं सकारात्मक आणि चर्चेच्या माध्यमातून चर्चा घडउंन आणली. वाघमारे जे.के. गणित विषय आणि त्याचा कृती आराखडा याची सविस्तर माहिती दिली.दशक संख्येचे बंद आणि एक्काचे सुट्टे रुप याबद्दल सविस्तर विवेचन केले.


दुगाणे सर गूगल मीट वर होस्ट मगणून लिंक कशी शेअर करावी याचे कृतीतून मार्गदर्शन केले. धोपटे सर या भागांमध्ये खालील विषयावर चर्चा विचारविनिमय व मार्गदर्शन केले.

1) निष्ठा 3.0 ऑनलाईन प्रशिक्षण

2) वाचन विकास कार्यक्रम

3 Read to me app installation

4) शिकू आनंदे

5) गोष्टीचा शनिवार

6) स्वाध्याय

7) आजादी का अमृत महोत्सव

निष्ठा प्रशिक्षण, व FLN या कार्यक्रमावर सविस्तर असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केंद्रातील उपक्रमशील,कृतिशील शिक्षक यांच्या जाऱ्याचा उल्लेख करून सविस्तर विवेचन करून, मार्गदर्शन करून सर्वांना समजावून सांगितले तसेच शैक्षणिक व प्रशासकीय सूचनासुद्धा सर्व केंद्रातील शिक्षक व मुख्याध्यापक यांना देण्यात आल्या.


भारती मॅडम आजची शिक्षण परिषद अत्यंत खेळीमेळीच्या उत्साह वर्धक व आनंदी वातावरणात पार पडली.काही सूचना केल्या मार्गदर्शन केले आणि बरोबर 4:00 वाजता शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली द्वितीय सत्राचे आभार प्रदर्शन श्री किशोर नरवाडे सर यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)