जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथे क्रांतिकारी राष्ट्रसंत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

येथील जिल्हा परिषद हायस्कूल वाघी तालुका जिल्हा नांदेड येथे क्रांतिकारी राष्ट्र संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक सुरेश ओंकार बादशहा हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच गणपतराव राठोड उपस्थित होते. 


यावेळी बोलताना ते म्हणाले की क्रांतिकारी राष्ट्र संत सेवालाल महाराज यांचे कार्य खूप मोठे आहे आणि सर्व समाजासाठी दिशादर्शक   काम त्यांनी केले आहे. सर्वांनी त्यांनी दाखवलेला मार्ग अवलंबावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की शाळा विकासासाठी मी सर्वोतोपरी मदत करील असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.यावेळी स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारी राष्ट्र संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर आधारित बाबीवर माहिती भाषणाच्या रुपाने विषद केली व श्रमदान केले. सर्व उपस्थित शिक्षक यांनी प्रतिमा पूजन केले. 


यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम कराळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी केले.यावेळी संजय शेळगें,डॉ.हेमंत कार्ले, रावसाहेब देवकते, बालाजी क्षीरसागर, राजाराम कराळे,बालाजी गीते,राजकुमार गोटे,श्रीधर जोशी,विठ्ठल पवार,सुदर्शन बिंगेवार, रामदास अलकटवार, विलास झोळगे,ऋषिकेश ढाके,जयश्री वडगावकर, शेळके रघुनाथ, प्रलोभ कुलकर्णी हे शिक्षक वृंद या वेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर नामेवार ,पुष्पा बिरादार स्काऊट गाईड चे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)