पार्डीच्या जि .प .शाळेचे शिक्षणाधिकाऱ्यांनी केले कौतुक ...!

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अर्धापुर तालुक्यातील पार्डी म .येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज रोजी मा .शिक्षणाधिकारी प्रा .सविता बिरगे मॅडम यांनी भेट देऊन शाळेची गुणवत्ता तपासणी करून शाळेमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांनी प्रशंसा केली आणि शाळेविषयी कौतुक केले आहे .


अर्धापुर तालुक्यातील पार्डी म .येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली पासून चौथीपर्यंत असून शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात .कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यातरी शिक्षण सुरू उपक्रमांतर्गत घरोघरी शाळा सुरू होती .यामुळे शाळेची गुणवत्ता ठिकून आहे .


शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येते 


शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रमात घरोघरी जाऊन शिक्षण दिले , आई - बाबाची शाळा उपक्रम , स्वाध्यायपुस्तिका ,शाळेच्या आवारात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन , शाळेची रंगरंगोटी , बुलबुल पथक , गुगल चाचणी निर्मिती ,लेझीम पथक , बालरक्षक चळवळ इत्यादी उपक्रमांची शिक्षणाधिकारी यांच्याकडून पाहणी केली आहे .शाळेतील वर्गाची गुणवत्ता तपासणी आणि उपक्रम अतिशय छान राबवत आहेत असे मत व्यक्त केले आहे .


बुलबुल पथकाकडून डायरी भेट 


शिक्षणाधिकारी शाळेमध्ये गुणवत्ता तपासणी करण्यासाठी आले असता शाळेमधील बुलबुल पथक मधील  कु .गुंजन व सिद्धी मरकुंदे यांनी शिक्षणाधिकारी प्रा .सविता बिरगे यांना डायरी भेट दिली आहे .


यावेळी केंद्रप्रमुख विठ्ठल आचणे , मुख्याध्यापक बाबुराव जाधव , शाळेचे मुख्याध्यापक राजेश देशमुख ,सहशिक्षक योगाजी कल्याणकर ,रमेश पावडे ,मंगला सलामे ,उषा नळगिरे उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)