दाबदरी जि.प. शाळेत शालेय साहित्याचे वाटप

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी दाबदरी गावचे उपसरपंच बालाजी दादा राठोड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाबदरी केंद्र पोटा बुद्रुक तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गावाविषयी व शाळेविषयी आपली कृतज्ञता दाखवून दिली आहे. 


त्याचबरोबर दाबदरी सारख्या आदिवासी भागातील पालक दारिद्र्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना पेन,वही,पुस्तक घेऊन देऊ शकत नाहीत याची जाणीव बालाजी दादा राठोड यांना असल्यामुळे त्यांनी स्वखर्चातून आपल्या वाढदिवसाचा इतर खर्च टाळून दाबदरी  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पेन,वही,पुस्तक यांचे वाटप केले. त्यांचा वाढदिवस ५ फेब्रुवारी २०२२ रोजी होता. दोन दिवस सुट्टी असल्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस शाळेत येऊन साजरा केला. 


यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा बनकर मॅडम सहशिक्षक अनिल कटके,सुधाकर गायकवाड तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक गणेशराव भिसे यांची उपस्थिती होती. बालाजी दादा राठोड यांनी शालेय साहित्याचे वाटप केल्याबद्दल अंतकरणपूर्वक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा बनकर मॅडम यांनी त्यांचे आभार मानले, कृतज्ञता व्यक्त केली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)