"परीक्षा" परीक्षेची

शालेयवृत्त सेवा
0




मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

महाराष्ट्र राज्यामध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर शालेय वातावरण परीक्षामय झालेले आहे. राज्यातील शिक्षण पध्दत गेली दोन वर्ष ऑनलाइन पद्धतीने चालू आहे पण राज्य सरकारला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे अशक्य आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आपण दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रचलित पद्धतीने घेत असल्याचे जाहीर केले. शाळेतील विद्यार्थी व काही शिक्षक संघटना व पालकांनी आँफलाईन परीक्षेला विरोध केला असला तरी परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 


गेली दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया पार पाडण्यात आली. देशातील तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता फारच कमी झालेला आहे या पार्श्वभूमीवर पुर्ण क्षमतेने शाळेचे वर्ग सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. शिक्षणाधिकारी शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांनी ही शाळा पुर्ण क्षमतेने सुरू करण्यास न्यता दिली आहे. शाळांमध्ये  विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहेत त्याच शाळेत  त्यांचे परीक्षा केंद्र असल्याने परीक्षा सुरळीत पार पडतील यात शंका नाही .


 परंतु याच काळामध्ये शाळेचे नियमित वर्ग पूर्ण सुरू करण्याचा विचाराला मात्र खिळ बसलेली आहे. कारण परीक्षा मंडळाने या वर्षी विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अतिरिक्त वेळ दिलेला आहे. राज्य बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक पेपर साडेतीन तास त्याआधीची पूर्वतयारीसाठी अर्धा तास म्हणजे चार तास पर्यवेक्षणासाठी जाणार आहेत. त्यानंतर एका दिवशी दुपारच्या सत्रात परीक्षा  असल्यास पुर्ण दिवस परिक्षेत गेल्यामुळे नियमित वर्ग सुरू ठेवण्यास अडचण  निर्माण होणार आहे. मुंबईतील शाळेतील निधी तांबे मँडमच्यां मतानुसार एकाच दिवशी दोन परीक्षा असल्यामुळे  पूर्णवेळ शाळा चालू ठेवणे अशक्य आहे. 


अध्ययन अध्यापन प्रक्रिया पर्यावेक्षण या दोन्ही क्रिया शिक्षकांनाच करावे लागत असल्यामुळे  मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांना काम करण्यास ताण येण्याची शक्यता आहे यामुळे पुर्णवेळ शाळा चालू होणे अशक्य आहे यामुळे मार्च महिन्यात परीक्षा केंद्रावरील शाळा पुर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता कमी आहे. शिळेतील शिक्षिका सायली सिंग यांच्या मतानुसार या वर्षाची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आव्हानच आहे. दोन वर्षे लिखाणाचा सरावात खंड पडल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिले अतिरिक्त वेळ हा फायद्याचे ठरणार असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या दुरदृष्टींचे त्यांनी स्वागत आहे. मनिषा जैन यांच्या मते यावर्षी मुल्यमापन पध्दतीत सारासार विचार करून लवचिकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.


विजय महाजन या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करताना समुपदेशनाची आज खरी गरज आहे असे मत व्यक्त केले. दोन वर्षे कोरोनामुळे परीक्षा पध्दती कोलमडून गेली होती. देश आता पुन्हा एकदा गतीमान होऊ पाहत आहे. अशावेळी परीक्षा मुल्यमापनाचा एकमेव मार्ग आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे गेले पाहिजे असा सुर शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे. खऱ्या अर्थाने परीक्षेचीच ही "परीक्षा "आहे असे वाटते. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)