शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धेत शताक्षी शंकर गच्चे चे यश !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हास्तरीय सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत यश मिळवण्याचा विक्रम शताक्षीने केला आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद व त्यांच्या ३२ कक्षांनी मिळून छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त शिवचरित्रातून काय शिकावे याविषयीची वकृत्वस्पर्धा, छत्रपती शिवरायांचे स्त्री विषयक धोरण या विषयावर निबंध स्पर्धा व शिवजन्मोत्सवावर रांगोळी स्पर्धा घेतल्या. 


या स्पर्धेत पाचवी ते आठवी या लहान गटात शताक्षी शंकर गच्चे इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, निबंध स्पर्धेत प्रथम,व रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर स्वयंदिप गच्चे इयत्ता पहिली या विद्यार्थ्याला रांगोळी स्पर्धेमध्ये प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अशोकराव चव्हाण, या कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध व्याख्याते प्रेमकुमार बोके, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे प्रतिनिधी राजश्री पाटील, माजी आ.अमर राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्रीताई पावडे ,जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, उद्धवराव पाटील सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संकेत पाटील,शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे महासचिव व्यंकटराव जाधव, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी पाटील बामणीकर, सुरेश घोरबांड , जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कानोले , कार्याध्यक्ष उत्तमराव जाधव , जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा डॉ. विद्या पाटील, अरुणा जाधव उपस्थित होत्या. 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकेत पाटील यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश ढगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी असंख्य मावळ्यांनी परिश्रम घेतले. आणि संपूर्ण शिवजन्मोउत्सव सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)