"मैत्री विज्ञानाशी"

शालेयवृत्त सेवा
0



मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे)  :   

२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दिनांक २१/२/२२ ते २८/२/२२ या कालावधीत विज्ञान सप्ताह साजरा केला. राष्ट्रीय विज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रम केले जातात. सरस्वती विद्यामंदिर घाटकोपर येथे विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड तसेच त्यांच्यातील शोधात्मक दृष्टी चा विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.


          यावर्षी शाळेत विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला. देशाच्या विकासासठी वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार होणे गरजेचे आहे. त्यांच्या शोधानी सामान्य माणसांचा फायदा झालेला आहे यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी आणि विज्ञानाचे महत्व जाणण्यासाठी शिक्षण निरीक्षक उत्तर विभागातील विषय साधन व्यक्ती श्रीमती सुवर्णा सावंत मॅडम , शाळेच्या संचालिका- दिपाली पवार मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक- श्री जगदीश चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाने " मैत्री विज्ञानाशी" हा उपक्रम राबवण्यात आला. या उक्रमाअंतर्गत दिनांक २१/२/२२ ते २८/२/२२ फेब्रुवारी पर्यंत दररोज विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

       इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली."माझे आवडते वैज्ञानिक" या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी डॉ. सी. व्ही. रमण, चार्ल्स डार्विन, एडीसन, अब्दुल कलाम इत्यादी अनेक वैज्ञानिकांची माहिती व शोधाचा परिचय विद्यार्थ्यांनी दिला.

          राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्याचे महत्व सांगणारे विज्ञान गीत, विज्ञानाने माणूस चंद्रा वर गेला तरी अंधश्रद्धतून मुक्त नाही झाला. हे स्वरचित काव्य अभिनयासहित सादर केले. छोट्या नाटिका सूर्यमालेवर आधारित गीत सादर केले.


         ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा " विज्ञानाचे आविष्कार" निबंध स्पर्धा " विज्ञान मानवास शाप की वरदान" या विषयावर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या.

             विज्ञान शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली " मैत्री विज्ञानाशी" कार्यशाळा भरवण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रात्याशिक सादर केले. छोटे छोटे प्रयोग सादर केले. वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी  विज्ञान दिन मनोगत सादर केले.प्रकल्प प्रदर्शन भरवण्यात आले.


       शाळेचे मुख्यध्यापक श्री जगदीश चौधरी सर यांनी  या उपक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

        श्रीमती शर्मिला कणसे, श्रीमती मेघना जाधव, श्रीमती वर्षा हिरे, श्रीमती योगेश्री रासम, श्रीमती मुणगेकर व इतर शिक्षक यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले अशा प्रकारे सरस्वती विद्यामंदिर घाटकोपर पश्चिम या शाळेतील" मैत्री विज्ञानाशी" उत्सव नियोजनपूर्वक साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)