"सरोवर शिक्षण मंडळात माता पालक मेळावा निमित्त नवीन प्रवेश विद्यार्थ्यांचा सत्कार"

शालेयवृत्त सेवा
0

 



सांगली: covid-19 च्या लॉकडाऊन मध्ये घरी बसून कंटाळलेले माता पालकांच्या जीवनामध्ये एक आनंदाची लहर उमटावे यासाठी सरोवर शिक्षण मंडळाच्या अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल व सरामद जयनब उर्दू  स्कूल यांच्या वतीने आज माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माता पालकांसाठी विविध मनोरंजन खेळ घेण्यात आले  व नंबर मिळवलेल्या पालकांना बक्षीस वाटप करण्यात आले.



त्याचबरोबर कार्यक्रमाचे औचित्य साधून नवीन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा व माता पालकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही शाळेच्या डिजिटल जाहिरातीचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक मा.हाजी मुनीरूद्दीन  मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांचे विशेष मार्गदर्शनही लाभले या कार्यक्रमास माता-पालक अध्यक्ष सौ.जुबेदा अल्ताफ मकुभाई व प्रमुख पाहुणे स्वलेहा मुल्ला या लाभल्या, प्रमुख उपस्थिती स्वालेहा  मुल्ला, अस्मा मुल्ला, सना  मुल्ला यांनी दर्शवली. मार्गदर्शन पर संस्थापक बोलत असताना म्हणाले की, लॉकडाऊन मध्ये शाळा बंद असल्या कारणामुळे मुलांचे खूप नुकसान झाले आहे. 



माता पालक त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तरच मुलांची व समाजाची प्रगती घडून येईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सौ.अस्मा नदाफ यांनी केले तसेच आभार तस्किन बेपारी  मॅडम यांनी मांडले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)