रोहिदास तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

शालेयवृत्त सेवा
0




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जि. प.प्रा.शाळा रोहिदास तांडा केंद्र-कमठाला येथे संत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती मोठया उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नामदेव चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कमठाला केंद्राचे केंद्रप्रमुख तथा मु.अ. श्री. शरद कुरुंदकर सर होते.तसेच गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


           सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. नंतर सर्व उपस्थितांनी अभिवादन करून श्री.सेवालाल महाराज यांच्या विषयी मनोगत व्यक्त करण्यात आले. श्री. साहेबराव चव्हाण यांनी सेवालाल महाराज यांचे दोहे म्हणून त्याचा अर्थ उपस्थितांना समजावून सांगितला.याप्रसंगी काही विद्यार्थीनी व महिला आपला पारंपारीक वेष परिधान करून आल्या होत्या.एकंदरीत त्या आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवत होत्या.



            गावातील महिलांनी त्यांची पारंपारिक गीते सादर केली.तसेच काही बंजारी गीतावर पारंपारिक नृत्य सादर  करून उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांनी संत सेवालाल महाराजांविषयी आपले मनोगत सादर केले.

             शेवटी श्री. शरद कुरुंदकर सर यांनी सर्वांसाठी  आणलेली मिठाई वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.तसेच चॉकलेटसुध्दा वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शेरे पी.जी.(मु.अ.)यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीमती. शालिनी सेलूकर मॅडम यांनी केले.


     यावेळी कार्यक्रमास श्री.साहेबराव चव्हाण,शिवाजी चव्हाण,दिलीप चव्हाण,सुभाष चव्हाण तसेच सौ. कमलबाई चव्हाण,शांताबाई चव्हाण ,अनुसयाबाई चव्हाण,सुरेखा राठोड,भागाबाई चव्हाण,गिरीजाबाई चव्हाण,आशा जाधव अंगणवाडी सेविका कविताबाई चव्हाण या गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या .




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)