मुख्याध्यापिका आशालता व्यंकटराव रामगिरवार सेवापुर्ती निमित्त निरोप.

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (शालेय वृत्तसेवा ):

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेगाव येथील मुख्याध्यापिका आदरणीय आशालता व्यंकट राव रामगिरवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त केंद्र निळा आणि त्यांच्या प्राथमिक शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला.

               


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग निळा च्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ.शोभा गंगाधरराव भारती मॅडम होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र निळा चे केंद्रप्रमुख आदरणीय श्री धोपटे व्ही.एस.,वरिष्ठ प्राथमिक शाळा पुयनी चे पदोन्नत मुख्याध्यापक श्री पडगिलवार सर, वरिष्ठ प्राथमिक शाळा तळणी चे पदोन्नत मुख्याध्यापक श्री गोवंदे आर.डी.,मरळक बु.च्या मुख्याध्यापिका श्रीमती वाटेगावकर मॅडम, आलेगावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच आदरणीय सौ.सरस्वती बाई पाटील, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री शहाजी पंडितरावं पाटील, मॅडम चे यजमान विनायक नागनाथराव रेंनगुटवार सर,मॅडम चे दीर यशवंत हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री विजय नागनाथराव रेंनगुणटवार जाऊ,दोनभाऊ,भावजयी,मुलगा आणि ,सून आणि,निकटचे पाहुणे,आणि निळा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

       


 इयत्ता पाचवितील मुलींनी वेशभुषेत स्वागत गीत गायले.सर्वप्रथम मॅडमच्या सेवाकाळाचा आणि त्याच्या स्वभावाचा परिचय उपस्थिताना करून देण्यात आला.पाचवीतील मुलींनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.  धोत्रे मॅडम या रामगिरवार मॅडम च्या चोफळा केंद्रात असतानाच्या विध्यार्थीनी असून त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून त्यांच्याबद्दल चा आदर व्यक्त केला.देवसरकर मॅडमनी रामगिरवार मॅडम च्या कार्याचा गौरव केला.आणि त्यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

    


विजय रेनगुंटवार सर मॅडम चे दीर असून यशवंत हायस्कूल उमरी चे उप मुख्याध्यापक आहेत.त्यांनी मॅडम म्हणजे आमचा संपूर्ण परिवार एकत्र ठेणाऱ्या कार्यकुशल आणि आईप्रमाणे आहेत अशी प्रतिक्रिया दिली.

पाटील सर लाल बहादूर शास्त्री निळा चे मुख्याध्यापक परीक्षेच्या कामात अतिशय व्यस्त असतानाही पूर्णवेळ थांबून मॅडमनी आमच्या गावात खूप सुंदर कार्य केल्याचे सांगितले.मॅडमचे बधू मॅडम म्हणजे माझी दुसरी आईच होत्या. त्यांनीच कुठे कुठे कसे कार्य केले या बदद्ल माहिती सांगितली.मॅडम च्या जाऊ यांनी तर खूपच सुंदर प्रतिक्रिया दिली वळसांगिकर मॅडम मॅडम च्या कार्यावर स्वरचित एक सुंदर कविता सादर केली.मॅडम चा मुलगा हे बोलले नाहीत पण त्यांनी आपल्या आईसाठी रचलेली कविता त्यांच्या मामानी म्हणून दाखवली.

धोपटे सर मॅडम एक कुशल प्रश्यासक, कुठलेही काम वेळच्या वेळी करणाऱ्या,आणि व्यवस्थित करणाऱ्या असून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

          


रामगिरवार मॅडम सत्कारास उत्तर देताना मॅडम अतिशय भारावून गेल्या होत्या.तरीपण त्यांनी एक गीत आणि एक दृष्टांत देऊन.आपण शिक्षणासारख्या पवित्र कार्यात काम करत आहोत याचा सार्थकी अभिमान असल्याचे सांगितले.आणि माझ्या यशात माझी आई आणि माझे पती विनायकराव सहभागी असून माझे अधिकारी,माझा स्टाफ आणि माझे गावकरी यांचे ही त्यांनी आभार मानले.त्यांना भरपूर बोलायचे होते परंतु त्या इतक्या भारावून गेल्या की बरेच काही सांगायचे राहून गेले.

        


आभार प्रदर्शन प्रा. शाळा आलेगाव च्या कर्तव्य दक्ष प्राथमिक शिक्षिका आदरणीय सुनयना वळसंगीकर मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.त्या नंतर सर्वांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली.

               

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती मॅडम,धोपटे सर,चोंडे सर,गोवंदे सर,पडगिलवार सर,पतंगे सर, खाडे सर,डोईफोडे सर,सोनटक्के सर,सालेगाये सर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचन पोहरे कैलास यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)