जीवनात व्यक्त होणे अत्यंत महत्वाचे आहे - डॉ. विलास ढवळे

शालेयवृत्त सेवा
0

 



आनंद यडपलवार यांच्या 'नयनी अश्रू दाटले ' काव्यसंग्रहाचे प्रकाशन !


नांदेड ( नासा यवतीकर ) : 

जीवनात व्यक्त होणे अत्यंत महत्वाचे आहे. जी व्यक्ती मनातील भावना व्यक्त करत नाहीत ते आत्महत्या करतात. भांडण झाले असले तरी एकमेकांशी संवाद साधत राहावे. त्यामुळे माणूस समाधानी जीवन जगू शकतो. असे नयनी अश्रू दाटले काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समयी डॉ. विलास ढवळे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील उपक्रमशील आदर्श सहशिक्षक आनंद शंकरराव यडपलवार लिखित " नयनी अश्रू दाटले" या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा जारीकोट येथे संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीचे कवी व साहित्यिक डॉ. केशव खटिंग हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद नांदेडचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे, नांदेडचे कवी व साहित्यिक व्यंकटेश काटकर, नांदेड स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पल्लेवाड, गजानन रामोड, व्यंकट यडपलवार, विजय काळे, गोविंदराव धुप्पे, साईनाथ माळगे, अशोक इलतेपोड, क्रांती बुद्धेवार, श्याम मोकमोड, विष्णू गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 


तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जि. प. हा. जारीकोट येथील विद्यार्थिनीनी स्वागत गीत आणि प्रार्थना सादर केल्या. सन 2020 व 2021 मधील दहावी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या मनिषा हणमंत धुप्पे, श्वेता लक्ष्मीकांत स्वामी, कोमल दिगंबर धुप्पे आणि वैष्णवी गोविंद धुप्पे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कवी व साहित्यिक व्यंकटेश काटकर, डॉ. सुनील पल्लेवाड आणि अध्यक्ष डॉ. केशव खटिंग यांनी आपल्या भाषणातून कवी आनंद यडपलवार यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. पद्मावती पल्लेवाड, माहेश्वरी यडपलवार, श्रीमती धुरपतबाई यडपलवार, सौ. रुक्मिणी यडपलवार, माधवराव यडपलवार, माधव भोजराज, शंकर भोजराज, गोविंद रामोड, साहेबराव उप्पोड, बालाजी गुंटोड, कांतराव धुप्पे, लक्ष्मण मुपडे, विरभद्र बसापुरे, गंगाधर गंगुलवार, गणेश सिरमलवार, श्याम नरवाडे, नागोराव कमलाकर, विठ्ठल मुपडे, शंकरराव कमलाकर, पोषट्टी गोरठे, राम रंगे, मिथुन मुपडे, योगेश रामोड, साईनाथ जारीकोटकर यांची उपस्थिती होती.


 पुस्तक प्रकाशनानंतर निमंत्रित शिक्षकांचे कविसंमेलन झाले त्यात पांडुरंग आडबलवाड, बालिका बरगळ, विलास कोळनूरकर, प्रल्हाद घोरबांड, पांडुरंग कोकुलवार, मनमोहन कदम, दिगंबर कानोले, भगवान चव्हाण, रामदास टेकाळे, विलास हनवते, आनंद यडपलवार, कैलास धुतराज, नासा येवतीकर आदींनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन कैलास धुतराज यांनी केले तर ना. सा. येवतीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील आणि तालुक्यातील असंख्य कविप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सवप्रेमी मायेची माणसं समुहातील सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)