राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचा शिक्षक संघाच्या बैठकीत निर्णय..

शालेयवृत्त सेवा
0

 



राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाची  राज्यकार्यकारणीचीआॅनलाइन बैठक  संपन्न..


शालेय वृत्तसेवा:

राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ या संघटने राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांची राज्यस्तरीय बैठक राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली ३०जानेवारी २०२२रोजी झुम अॅपद्वारे घेण्यात आली .या बैठकीसाठी संघटनेचे राज्यपदाधिकारी,विभागीय अध्यक्ष ,सरचिटणीस ,जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यासह आदि उपस्थित होते.


बैठकित विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आले आहे.या बैठकीत  राज्यातील राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक यांना संघटनेचे सभासद करून घेऊन सभासद संख्या वाढवणे, जिल्हा कार्यकारणी , विभागीय कार्यकारणीचा विस्तार करून लेटर पॅड तयार करणे. राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक जिल्हा शाखेने व विभागीय शाखेने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्त, शिक्षण आयुक्त ,उपसंचालक,,शिक्षणसंचालक यांच्या मार्फत निवेदन देऊन राष्ट्रीय व राज्य शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणे.शिक्षकांचे प्रश्न प्रश्न निवेदन विनंती करून न सुटल्यास संघटनेमार्फत आंदोलनात्मक निर्णय घेणे,राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रश्नाबरोबरच जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रश्न सोडविणे.


राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन जादा वेतनवाढी पुर्ववत सुरू करणे,कायमस्वरूपी ओळखपत्र मिळणे,बस व रेल्वे मोफत पास मिळणे, वार्षिक सर्वसाधारण बदल्या मध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना संवर्ग १मध्ये सामावेश करणे, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी  यांच्या पदावर प्राधान्याने सामावून घेण्यासाठी जिल्हापरिषद व खाजगी संस्थेमध्ये कार्यरत सर्व शिक्षकांचे प्रस्ताव मागविणे.संघटना आर्थिक बळकट करण्यासाठी सभासद व संवर्धन निधी जमा करणे.संघटने वार्षिक अधिवेशन घेणे.यासह आदि विषयांवर चर्चा करून बहुमताने सर्व ठराव मंजुर करण्यात आलेत.


या राज्यस्तरीय बैठकीत सर्व  पदाधिकारी सहभागी नोंदविला जे पदाधिकारी बैठकीला सतत अनुपस्थित राहतात त्यांना नोटीस ,सुचना देणे ,सतत बैठकीला अनुपस्थित राहणा-यांना पदावरून कमी करणे,एका पदाधिकारी यांच्याकडे एकाच पदांची जबाबदारी देणे आदि विषयांवर पदाधिकारी आपले मत मांडले.यावर एकमताने निर्णय घेऊन अध्यक्षांच्यापरवानगीने अमंलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले.बैठकिचे सुत्रसंचलन राज्य सरचिटणीस अनंता जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रदर्शन सहसचिव माधव वायचाळ यांनी मानले . बैठक यशस्वीतेसाठी राज्यकार्याध्यक्ष दशरथ शिगारे,संभाजी ठुबे,सुनिल गुरव , आबासाहेब बचाव , डॉ शारदा रोशनखेडे,शिवराज सावंत ,दिलिप केने, भिमराव शिंदे,अमृत पाटील,सुनिल नायक,अनिल चव्हाण,गजानन देशमुख,सतिष चिपरीकर, पुरुषोत्तम साकुरे,धनराज वाणी,बळीराम चव्हाण , यासह आदिनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)