मारतळा शाळेत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा..

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा शाळेत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निमित्ताने वर्ग पाचवी ते सातवीच्या मुलांनी विविध भाषा लिहलेल्या भीतीपत्रकाचे अनावरण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदराव ढेपे यांच्या हस्ते करण्यात आले नंतर उपक्रमाचे प्रमुख रवी ढगे यांनी मुलांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा २००० पासून जगभरात शांतता, बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी करण्यातआला असून .दिनांक २१ फेब्रुवारी १९५२ मध्ये सुरवातीला बंगाली भाषा ओळखावी म्हणून बांगलादेशात हा उत्सव साजरा केला जातो.



नंतर नोव्हेंबर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (यूनेस्को) च्या जनरल कॉन्फरन्सने हा दिवस जाहीर केला. संयुक्त राष्ट्र महासभेने १६ मे २००९ रोजी वापरल्या जाणार्या सर्व भाषांचे संरक्षण करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्या सदस्यांना तयार केले. तद्नंतर ठराविक संकल्पनेत, बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारतेतील एकता वाढवण्यासाठी जनरल असेंब्लीने २००८ मध्ये  आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. रझाकुल इस्लाम, कॅनडातील व्हॅंकुव्हरमध्ये राहणारी बंगाली या संकल्पनेची सुचना देण्यात आली. त्यांनी ९ जानेवारी १९९८ रोजी कोफी अन्नान यांना पत्र लिहिले की त्यांनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस घोषित करून जगातील भाषा वाचविण्यापासून एक क्रांतिकारक पाऊल  उचलण्यास बोलले.



भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन असल्याचे मत रवी ढगे सर यांनी सांगितले यावेळी शाळेचे मु अ व्यंकटराव मुगावे देवबा होळकर प्रल्हाद पवार बालाजी प्यार लावा र उपक्रम शील शिक्षक रवी ढगे श्रीमती उज्वला जोशी ,जयश्री बारोळे ,माधुरी मलदोडे, रमेश हणमंते व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)