कविता गाडगेबाबाची.. 'प्रबोधन '

शालेयवृत्त सेवा
0

 



॥ प्रबोधन ॥


खर्चु नका देवासाठी पैसा । 

शिक्षणाला पैसा तोच द्या हो ।।


नको मंदिरांची करावया भर । 

छात्र जो हुशार त्यास द्यावा ।। 


नको धर्मकृत्ये पैसा खर्चुनिया । 

घेण्यासाठी विद्या तोच खर्चा ॥


 शाळेहुन नाही थोर ते मंदिर । 

देणगी उदार शाळेला द्या |।


भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर । 

शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ ।।


गरिबांनी तरी फेकावा विश्वास । 

देवाजीची आस पूर्ण खोटी ॥ 


नसलेले देव कोठून येणार ? 

कल्याण होणार कधी सांगा ।। 


स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने । 

शक्तीने, युक्तीने सुखी व्हावे ॥


-संत गाडगेबाबा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)