विचारांचा गोंधळ म्हणजे अपयश तर सुस्पष्ट विचार म्हणजे यश - बालासाहेब कच्छवे

शालेयवृत्त सेवा
0

 



मानसशास्त्रीय समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !


किनवट ( प्रतिनिधी ) :

विचारांचा गोंधळ म्हणजे अपयश तर सुस्पष्ट विचार म्हणजे यश असे प्रतिपादन नांदेड डायचे समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांनी केले. येथील शासकिय आश्रम शाळेत शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने मानसशास्त्रीय समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. 



अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डायटचे जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे, ग्रामीण तंत्रनिकेतन नांदेडचे डॉ. निलेश आळंदकर, द युनिक अकॅडमी पुणेचे कपिल हांडे व गणेश गवळे, माहूरचे शिक्षण विस्तार अधिकारी मुधोळकर , किनवटचे शिक्षणविस्तार अधिकारी संजय कराड आदी उपस्थित होते.



पुढे बोलतांना कच्छवे म्हणाले की ध्येय निश्चित करा केव्हा ? कुठे ? कसे ? याचे नियोजन करा. चांगली पुस्तकं वाचा चांगल्या माणसाच्या - मार्गदर्शकांच्या सानिध्यात जा. मुलांमध्ये न्यूनगंड नसावा सर्वच मुले चांगले आहेत. तीच माणसं ग्रेट आहे जे आपल्या माणसात आनंद पेरतात. यशाच बीज मनात असावं असेही ते म्हणाले.




शासकीय आश्रम शाळा किनवटचे मुख्याध्यापक नागनाथ कराड यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णुपुरी नांदेडचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. निलेश आळंदकर यांनी उपस्थित विद्यार्थी व मुख्याध्यापकांना तंत्र शिक्षणातील करिअरच्या संधी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. युनिक अकॅडमी पुणेचे कस्टर हेड कपिल हांडे यांनी एमपीएससी आणि युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी, स्पर्धा परीक्षेच्या पाया, मुलाखत देताना करावयाचे नियोजन आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. माहूरचे शिक्षणविस्तार अधिकारी मुधोळकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी महा करिअर पोर्टलची सविस्तर माहिती देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. राज्य पुरस्कृत शिक्षक रमेश मुनेश्वर यांनीसू त्रसंचालन तर बी. एम. सूर्यतळे यांनी आभार मानले.



यावेळी युनिक अकॅडमीच्या वतीने शासकीय आश्रम शाळा किनवट, गटशिक्षणाधिकारी कार्यालय किनवट, जिल्हा परिषद हायस्कूल मांडवी, इस्लापूर, कोसमेट, बोधडी, किनवट या शाळांना स्पर्धात्मक पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमास किनवट - माहूर तालुक्यातील मुख्याध्यापक आणि आश्रम शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)