अनेक विद्यार्थ्यांचे आधार लिंक त्रृटी असल्याने संच मान्यतेसाठी वेळ वाढवून द्यावा ; शिक्षणाधिकारी बिरगे मॅडमना ' इब्टा ' ने दिले निवेदन !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

विद्यार्थी शाळेच्या पटावर अस्तानाही आधार लिंक होत नसल्या मुळे संच मान्यतातेत अनेक शिक्षकांची पदे अतिरिक्त होत असल्याने प्रस्तुत ऑनलाईन संच मान्यता रद्द करून ऑफलाईन संच मान्यता करणेबाबत शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगे मॅडम यांना इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन ' इब्टा ' च्या वतीने निवेदन देण्यात आले.



सध्या 2021 - 22 संच मान्यता करण्याचे काम सुरू असून अनेक जिल्हा परिषद शाळेत वर्गाच्या पटावर पुरेसे विद्यार्थी असतानाही केवळ नावातील काना मात्रा बदल, वडीलाचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, नावातील इंग्रजी स्पेलिंग मुळे निर्माण झालेली चूक, जन्मतारखेतील जन्म दिनांक महिना वर्ष यामध्ये निर्माण झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाही. 



अद्यापही उपरोक्त त्रुटी असल्याने आधार कार्ड मिस्मॅच चे प्रमाण मोठे आहे परिणामी उपस्थिती पटावर विद्यार्थीसंख्या बरोबर असूनही आधार कार्ड मिस्मॅच मुळे विद्यार्थीसंख्या वस्तुस्थिती पेक्षा कमी येत आहे. परिणामी जिल्हाभरातील शाळातून मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे विशेष म्हणजे आधार दुरुस्तीचे ऑनलाईन प्रोसेस सध्या बंद आहे. 


वास्तविक विद्यार्थी संख्या व बंद असलेले आधार अपडेट प्रोसेस यामुळे अतिरिक्त होणार असलेली शिक्षक याबाबतीत योग्य असा निर्णय घेऊन सध्या होत असलेली संच मान्यता स्थगित करावे ऑफलाइन करावी किंवा मुदत वाढवून द्यावी असे निवेदन इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनचे केंद्रीय जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, सरचिटणीस निलेश गोधने आदी पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून दिले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)