शिक्षकांनी अध्ययन निष्पत्ती नुसार अध्यापन करावे- डॉ रवींद्र आंबेकर

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेचे उपक्रम शील शिक्षक रवी ढगे यांनी विविध उपक्रम राबवत असून मारतळा ही शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा म्हणून जिल्हाभर प्रसिद्ध  झाली आहे याची दखल घेऊन नुकतीच रवी ढगे यांची यशोगाथा या सदराखाली ऑनलाइन मुलाखत प्रसिध्द करण्यात आली. 


विशेष म्हणजे जिल्हा प्रशिक्षण शिक्षण संस्था नांदेड व जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शिक्षण मित्र हा उपक्रम सकाळी ऑनलाईन पद्धतीने तर शाळेत आल्यानंतर कोरोना चे सर्व नियम पाळून वर्ग पाचवी चे विद्यार्थी नियमीतपणे दोन तास समाज मंदिरामध्ये बसून अध्यापन केले त्यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवता आले.त्यांनी शासनाच्या वतीने सुरू केलेले उपक्रम  शिकू आनंदे,अभ्यासमाला 2.0 यांची प्रभावी अंमलबजावणी केली,तसेच शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेतले ,शाळेला तंबाखू मुक्त शाळा म्हणून गौरव मिळवून दिला तसेच वृक्षमित्र फाउंडेशन कडून ग्रीन स्कूल हा पुरस्कार मिळवून दिला असून  सुरुवातीच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये घरचा अभ्यास या स्वाध्याय पुस्तिका स्वखर्चाने मुलांना उपलब्ध करून देणे हा उपक्रम जिल्ह्याला दिशादर्शक ठरला.


शाळेत सर्व राष्ट्रीय व जागतिक दिन अनोख्या पद्धतीने साजरे करणे आदी उपक्रम तसेच मतदार दिवस निमित्ताने संकल्प पत्र तयार करणे तसेच मुलांना विविध स्पर्धा परीक्षेमध्ये बसवणे त्यांना प्रमाणपत्र मिळवून देणे आदी उपक्रम नाविन्य पद्धतीने मुलांच्या लक्षात राहतील अशा पद्धतीने राबवलेले पाहून डॉ रवींद्र आंबेकर सरांनी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांचे शाल देऊन अभिनंदन केले यांचे कार्य सर्वांना प्रेरणा  देणारे आहे असे प्रतिपादन सुद्धा केले. नंतर वर्ग पाचवीच्या मुलांशी संवाद साधला मुलांनी इंग्रजी विषयाची जस्ट नाऊ ही  कविता कृतीयुक्त सादर केली  त्याबद्दल मुलांचे अभिनंदन केले नंतर मुलांशी इंग्रजीतून संवाद साधला किशोर मासिकातील गोष्टी मुलांकडून ऐकल्या मुलांनी आंबेकर सरांचे फुल व तुळशीचे रोपटे देऊन स्वागत व शिक्षण मित्र शाळेसाठी धन्यवाद व्यक्त  केले  तर धुमाळ सर यांनी मुलांनी ऑनलाइन व ऑफलाईन वर्गात केलेल्या  मुलांच्याअभ्यासाच्या वह्या पाहून समाधान व्यक्त केले.  


यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख टी पी पाटील, अधिव्याख्याता चंद्रकांत धुमाळ सर, विषय सहाय्यक अतुल कुलकर्णी विषय तज्ञ कस्तुरे सर,  मु अ व्यंकटराव मुगावे ,देवबा होळकर ,प्रल्हाद पवार, बालाजी प्यारलावार, माधुरी मलदोडे ,उज्ज्वला जोशी जयश्री बारोळे व इतर शिक्षक उपस्थित होते केले शिक्षण आपल्या दारी या मारतळा केंद्रातील पहिली ते चौथी ला अध्यापन करणारे सर्व शिक्षक व उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांची एक दिवसीय कार्यशाळा घेतली यावेळी यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी नांदेड जिल्ह्यात आई बाबा ची शाळा हा उपक्रम लोहा तालुक्यात यशस्वीपणे राबविल्याबद्दल सर्व शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले .


यापुढे जाऊन आपल्याला विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती च्या आधारे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असल्याचे मत मांडले नंतर लोहा संपर्क अधिकारी अधिव्याख्याता चंद्रकांत धुमाळ सर यांनी यशोगाथा या सदराखाली मारतळा शाळेचे उपक्रम शील शिक्षक रवी ढगे यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या संकेत स्थळावर घेतलेली मुलाखत प्रसारित करण्यात आलेली आहे सदरील मुलाखत आपण सर्वांनी ऐकावे व त्यांनी राबविले उपक्रम आपल्या शाळेवर राबवता येतील का हेही पहावे शेवटी विशेष सहाय्यक अतुल कुलकर्णी यांनी शिक्षण आपल्या दारी या उपक्रमाची अंमलबजावणी करताना करावयाच्या सर्व कृती यासंदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी तर आभार प्रल्हाद पवार सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)