मारतळा केंद्रीय शिक्षण परिषदेस उस्फूर्त प्रतिसाद

शालेयवृत्त सेवा
0

 


         

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या सुचनेनुसार मारतळा केंद्रातील सर्व शिक्षकांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाका येथे शिक्षण परिषद घेण्यात आली यावेळी परिषदेचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री माधवराव पाटील हंबर्डे  प्रमुख पाहुणे म्हणून केंद्राचे केंद्रप्रमुख टी पी पाटील शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री बैलके व्ही डी  तसेच केंद्रातील सर्व उच्चश्रेणी मुख्याध्यापक तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपक्रमशील शिक्षक रवी ढगे उपस्थित होते.


परिषदेच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे य प्रतिमेचे पूजन करण्यात आले शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती चुटकुल वार यांच्या आईचे दुःखद निधन झाल्याबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून सदरील परिषदेत सहभाग मधून परिषदेतील सर्व विषय समजावून घ्यावे व मुलांची उपस्थिती शाळेत वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या नंतर  परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख टी पी पाटील यांनी केले .


 तर पहिल्या सत्रात श्री रवि ढगे यांनी शिक्षण आपल्या दारी याविषयी सविस्तर माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून सांगितले विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती कशा पद्धतीने सुधारता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले नंतर केंद्र अंतर्गत विविध शाळातील कोरोना कालावधीमध्ये राबविलेले उपक्रम जाणून घेतले दुसऱ्या सत्रात निष्ठा 3.0 याविषयी बारा प्रशिक्षण कशा पद्धतीने पूर्ण करावे याविषयी प्रात्यक्षिक व प्रमाणपत्र कसे मिळवावे याविषयी माहिती दिली नंतर वाचन उपक्रम, स्वाध्याय गोष्टीचा वार शनिवार शिकू आनंदे सर्व उपक्रम आपापल्या शाळेवर परिणामकारक रित्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.



तसेच सन 2018 पासुन शाळेच्या वैभवात झालेला बदल  वाका शाळेच्या यशोगाथे मधुन शाळेचे पदवीधर तन्त्रस्नेही शिक्षक श्री. दिलीप वाघमारे सर यानी सर्वासमोर मांडली. सदरील परिषदेस मारतळा केंद्राअंतर्गत असणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक विषय शिक्षक सहशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन सोनकांबळे सर आभार चव्हाण सर यांनी मानले तर दिलीप वाघमारे, कामपूर्ण सर ,मुळे मॅडम नागरगोजे मॅडम व रायकवाड मैडम यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)