शिक्षण परिषदेत झाले नेणवली शाळेचे 'अविष्कार ' हस्तलिखित प्रकाशित

शालेयवृत्त सेवा
0

 



रायगड ( शालेय वृत्तसेवा ) :

सुधागड तालुक्याच्या माननीय गटशिक्षणाधिकारी श्रीमती शिल्पा दास यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हस्तलिखित निर्मिती व्हावी यापेक्षा करण्यात आली होती. यातूनच रायगड जिल्हा परिषद शाळा नेणवली येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून आणि स्वअक्षरातून साकारले हस्तलिखित अविष्कार!!

 

विद्यार्थ्यांना सुलेखनाची गोडी निर्माण व्हावी,तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात, स्वतःच्या मनाने लेखन करावे आणि ते उत्तमरीत्या सादर व्हावे हा हेतू ठेवून नेणवली शाळेतील विद्यार्थ्यांनी या आविष्कार हस्तलिखित मध्ये आपल्या गावाबद्दल माहिती  नेणवली लेणी, गावातील बोलीभाषा,आदिवासी भाषा यावर लेख,कविता,चित्र, कोडी,म्हणी अशा विविधांगी लेखनातून हा आविष्कार हस्तलिखित सजलेला आहे.

  

या हस्तलिखिताचे प्रकाशन शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी  केंद्राची शिक्षण परिषदेत  रायगड जिल्हा परिषद शाळा नागशेत  येथे आतोणे  केंद्राच्या  केंद्रप्रमुखा श्रीमती कल्पना पाटील मॅडम यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.यावेळी केंद्रातीलआतोणे, खडसांबळे,खैरवाडी आणि आतोणे कातकरवाडी या शाळांचे देखील हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.

   

अविष्कार हस्तलिखिताचे वैशिष्ट्य म्हणजे याचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या संकल्पनेतून चित्र काढून सजविलेले आहे प्रास्ताविक  शाळेचा मुख्यमंत्री कुमार आदर्श चव्हाण  यांनी उत्तमरित्या लेखन करून आपले मत प्रकट केलेले आहे.गायमळ आणि खडसांबळे आदिवासी वाडी येथील मुलांची  आमची बोली आमची  भाषा यावर केलेले लेखन, पद्य अतिशय उत्कृष्टरित्या सादर केलेले आहे.

   

आविष्कार हस्तलिखित शाळेला आणि इतर सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक ठरेल ही आशा वाटते.

  -  श्री राजेंद्र अंबिके

   उपशिक्षक शाळा -नेणवली

   

आमच्या मनाने आणि स्वलेखनाने सजलेले हस्तलिखित तयार करताना आम्हाला खूपच मजा आली.

  -आदर्श चव्हाण / विद्यार्थी शाळा-नेणवली



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)