जि. प. प्रा. शाळा वायवाडी शाळेने सावित्रीबाई फुले यांना केले अभिवादन!

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायवाडी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक के.बी.कल्याणकर प्रमुख पाहुणे म्हणून  सहशिक्षक दत्ता मुसांडे, कृष्णा पांचाळ, सचिन भालेराव उपस्थित होते.


 यावेळी सवित्रिबाई  फुले यांच्या प्रतिमेस अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सवित्रिबाई  फुले यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.  त्यामध्ये आशिका आडे, भाग्यश्री पवार, सुषमा चव्हाण,साक्षी आडे, साक्षी पवार,नामेश्वर पवार,  यानंतर कृष्णा पांचाळ व के.बी. कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहशिक्षक शंकर गच्चे यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरील जय ज्योती जय ज्योती जय हा पोवाडा सादर केला. शेवटी  श्रद्धा जाधव या विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)