सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा कार्यक्रमांतर्गत निळा शाळेत यशस्वी महिलांच्या घेतल्या मुलाखती..

शालेयवृत्त सेवा
0

 





नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

या उपक्रमांतर्गत आज दिनांक 06 जानेवारी 2021 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथेयशस्वी महिलांच्या यशोगाथा /मुलाखती घेण्यात आल्या.

अंतर्गत ग्रामपंचायत निळा च्या सरपंच आदरणीय कोमल रोहित हिंगोले*यांची आमच्या शाळेच्या शिक्षिका आदरणीय वाघमारे मॅडम यांनी.तर प्रा.आ. केंद्र निळा च्या यशस्वी अधीक्षका आदरणीय जयश्री जाधव /खेडेकर मॅडम यांची आमच्या शाळेच्या शिक्षिका आदरणीय मोखंडपल्ले एस. एन.यांनी मुलाखत घेतली.


       आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री चोंडे एन.एम.पदोन्नत मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा ता.जि.नांदेड हे होते. त्यांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


          श्रीमती जाधव मॅडम यांनी आपल्या मुलाखतीतून आमच्या मुलांना आणि आम्हाला सर्वांनाच सुंदर मार्गदर्शन केले.तर निळा गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच आदरणीय कोमल हिंगोले यांनी शाळेसाठी अजून खूप काही करणार असल्याचे सांगितले.


             आपल्या अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक श्री चोंडे सर यांनी आजच्या कार्यक्रमात मुलाखत घेणाऱ्या मॅडम चे कौतुक केले.तसेच खुप व्यस्त असताना सुद्धा जाधव मॅडम आणि सरपंच मॅडम उपस्थित राहिल्या आणि खूप सुंदर मार्गदर्शन केले त्या बदद्ल आभार.आमच्या शालेय परिसरात खूप चांगल्या पद्धतीने मैदान दुरुस्ती करून दिली तसेच शाळेचे गेट,किचन शेड, मुलांसाठी मुतारी,मुलांसाठी स्वतंत्र्य टॉयलेट साठी काही करता येते का ते बघावे.आणि

आम्ही आपल्या ग्रामसभेत आपल्याकडे केलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात असे आवाहन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडे मॅडम,गंजेवार मॅडम,रत्नपारखी मॅडम,

पांपटवार मॅडम,श्री बेळगे सर, कर्णेवार मॅडम यांचे खूप सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन पोहरे कैलास यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)