सावित्रीमाईने हातात लेखणी दिली आणि महिला बोलू लिहू लागल्या - रमेश मुनेश्वर

शालेयवृत्त सेवा
0

 






शाळेत केला सन्मान सावित्रीच्या लेकींचा !


नांदेड( शालेय वृत्तसेव ) :

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समर्पण कार्याला तोड नाही. खांद्याला खांदा लावून शैक्षणिक, सामाजिक कार्यात महात्मा फुलेच्या त्या सोबत होत्या. सावित्रीमाईने हातात लेखणी दिली आणि महिला बोलू लिहू लागल्या असे प्रतिपादन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी केले.



लोणी येथील जिल्हा परिषद शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ते बोलत होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थिनीने स्वागतगीत गायले. सावित्रीबाई वेशभुषा केलेले शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर भाषणे आणि नाटिका सादर केली. यानंतर सन्मान सावित्रींच्या लेकींचा अभियानांतर्गत शाळेतील  महिला शिक्षिकेचा व अंगणवाडी सेविकांचा पुष्पगुच्छ व पेन भेट देऊन सन्मान करण्यात आला. 



यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांनी सावित्रीबाईच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिन बेग यांनी केले तर आभार विद्या श्रीमेवारनी केले. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका शोभा गेडाम, नंदा सावरकर, विद्यार्थी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)