वांगीच्या पालक विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्याची मागणी..

शालेयवृत्त सेवा
0

 



आमदार मोहन हंबर्डे यांना साकडे !


वाजेगाव ( शालेय वृत्तसेवा ) :

आज विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी नांदेड दक्षिणचे आमदार वांगी येथे आले असता कोव्हिडमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार अल्प असल्याने ग्रामीण भागांतील शाळा चालू करण्याची मागणी गावातील पालक, विद्यार्थ्यांनी आमदार मोहन हंबर्डे यांच्याकडे केली. या गावात मोबाईल नेटवर्क समस्या असल्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे मनोगत सरपंच दत्ता जाधव यांनी व्यक्त केले.    याप्रसंगी  जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे, बाभुळगावचे सरपंच पुंडलीक मस्के यांची उपस्थिती होती.


यावेळी माजी सरपंच गोविंदराव जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादाराव जाधव, उपाध्यक्ष नागोराव जाधव, मुख्याध्यापक लक्ष्मीबाई गायकवाड, उपक्रमशील शिक्षक व्यंकट गंदपवाड, विद्यार्थी ज्योती मिरकुटे, मुक्तता लिंगायत, बापु जाधव, निकिता जाधव, अश्विनी जाधव सायली शहापुरे, पालक बालाजी जाधव, बाबुराव जाधव, लक्ष्मण खोंडे, संभाजी जाधव, लक्ष्मण तारू, शेख अहेमद आदी बहुसंख्य पालकांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)