कवी, माणूस आणि अध्यापक: शिवा कांबळे

शालेयवृत्त सेवा
0

 



मा.शिवा कांबळे हे  "माणूस "हा घटक केंद्रित करून समूहात जगणारा उपक्रमशील शिक्षक आहेत. शेतीवर ,मातीवर आणि नियतीवर विश्वास ठेवणारा ,काळी माती सफल व्हावी म्हणून गावाकडली वहिवाट कधीही न मोडणारा ,आईच्या वात्सल्याचा सतत प्रवाह प्रवाहित ठेवणारा,  गाव,नाते मित्र ,गणगोत सांभाळून एक उंची गाठणारा अध्यापक आहे.


 शिवा कांबळे हे प्राथमिक शिक्षक, गटसमन्वयक ,विषय तज्ञ ,साधन व्यक्ती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक ते मुंबई विद्यापीठातील अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे सदस्य   असे अनेक पद त्यांनी भूषवले ...भुषवित आहेत.


  शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांचा अनुभव दांडगा असूनही ते निटपणे जमिनीवर अजूनही उभे आहेत हे सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घटना आहे.सत्य जीवनातून बाद न करणारा अवलिया शिक्षक म्हणजे शिवा कांबळे सर  "माती शाबूत राहावी म्हणून" , "विदेहाच्या  सावल्या" या माझ्या दोन कविता संग्रहाला अतिशय मेहनतीने उभं  करणारा, नयन बाराहाते यांच्याकडून मुख्यपृष्ठ  काढून घेणारा, कविता तपासणारा ,एक सर्वगुणसंपन्न शिक्षक म्हणजे आदरणीय शिवा कांबळे सर..


 त्यांचे घर म्हणजे आमच्या  साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे ..तिथे जावं ,त्यांना कविता म्हणून दाखवावी, दुरुस्ती करून घ्यावी, कुठेही कधीही वहिनी आणि त्यांनी न थकता ..गावाकडून गेलेल्या अनेकांची सेवाच केली. माझा " माती शाबूत राहावी म्हणून" 

 हा कवितासंग्रह त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भेट दिला. "कोरोना काळात: मुलांसाठी कविता" मी जो  उपक्रम राबवला होता. त्या उपक्रमात  मार्गदर्शक म्हणून शिवा कांबळे सरांचे पाठबळ नेहमी होते. 

मी कोरोना काळात:मुलांसाठी कविता

 (शालेय नाविन्यपूर्ण उपक्रम) हे   संपादन  केलेले पुस्तक  शिवा कांबळे सरांना अर्पण केल आहे.आज ह्या महान वैचारिक अधिष्ठान बाळगून असलेल्या उपक्रमशील शिक्षकांचा वाढदिवस आहे .

त्यानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी  मी निर्मिकाच्या ठिकाणी प्रार्थना करतो !!

बंधुवर्य शिवादादाना शुभेच्छा!!


- विरभद्र मिरेवाड / नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)