सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कामात स्वतःला वाहून घ्यावे - मनीषा बडगिरे

शालेयवृत्त सेवा
0

 



प्रदिर्घ सेवेनंतर केंद्रप्रमुख शिवाजी खुडे सेवानिवृत्त !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

पंचायत समिती किनवट शिक्षण विभागातील कमठाला केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम अतुलनीय आहे. सेवानिवृत्तीनंतर ते स्वतःला सामाजिक कामात वाहून घेतील. त्यांच्या कार्याचा गौरव सेवापुर्ती निमित्त आपण सर्वांनी केला हेच त्यांच्या सेवेचे पावती आहे. असे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मनीषा बडगिरे यांनी खुडे सरांच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रतिपादन केले .





सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांच्या स्वागतानंतर जिल्हा परिषद कमठाला शाळेतील विद्यार्थिनीने स्वागत गीत गायले तर कु. साक्षी तवरकर या विद्यार्थिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर भाषण केले. त्यानंतर कमठाला संकुलाच्या वतीने केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, कपडेरुपी आहेर देऊन निरोप देण्यात आला .





कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनुसया तडसे, कमठाला येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत भरकड, माजी सरपंच तुकाजी आत्राम, गणेशपूर येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर यांंनी केले, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी सुुत्रसंचालन केले तर आभार गणेशपुर ( जुने )चे मुख्याध्यापक प्रवीण पिल्लेवार यांनी केले .




याप्रसंगी पदवीधर शिक्षक अंकुश राऊत, लोणी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका शालिनी सेलुकर, देविदास वंजारे, अर्चना भंडारवार , विद्या श्रीमेवार, राजेश गोळकोंडावार आदींनी मनोगत व्यक्त केले . त्यानंतर केंद्रप्रमुख खुडे यांनी आपल्या मनोगतात 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल सविस्तर बोलले. विद्यार्थी केंद्रित माणून आनंददायी शिक्षण सर्वांनी द्यावे असेही मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले .




कार्यक्रम यशस्वीतेसाठी उर्मीला परभणकर, प्रीतम पाटील, शाहीन बेग, धनरेखा सांगविकर, विद्या श्रीमेवार, प्रेमिला जाधव, प्रशांत शेरे, परमेश्वर महामुने, राजू भगत, शंकर कुमरे, राजेश मोरताडे, नंदकुमार जाधव, बाबासाहेब आढाव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास केंद्रातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)