इयत्ता 5 वी व 8 वीच्या शिष्यवृत्ती आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ..

शालेयवृत्त सेवा
0

 



  पुरोगामी शिक्षक संघटनेच्या प्रयत्नाला यश !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने इयत्ता 5 वी व 8 वी च्या शिष्यवृत्ती आवेदनपत्र भरण्यास  मुदतवाढ देण्याची मागणी  करण्यात आली होती.   आयुक्त( शिक्षण)शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, संचालक शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना मेल द्वारे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पाठविण्यात आले होते .  ३१जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी.ती मान्य केली.त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील वंचित विद्यार्थी व राज्यातील विद्यार्थ्यांना लाभ होईल.अशी माहिती राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे यांनी दिली.


जिल्हा शाखेच्यावतीने  सविता बिरगे शिक्षणाधिकारी( प्रा.),बंडु आमदुरकर उपशिक्षणाधिकारी , शिष्यवृत्ती विभागप्रमुख उत्तमराव पेठकर यांनाही भेटुन निवेदन आयुक्त शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे  यांना मेल द्वारे पाठविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.  त्यांनीही निवेदनसह शिफारस पाठविलं .    


जिल्हा शाखेच्या वतीने  राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे जिल्हा उपाध्यक्ष जी. बी. मोरे ,हदगाव तालुकाध्यक्ष नागनाथ गाभणे व जिल्हा शाखेच्या वतीने आदींच्या प्रयत्नाला यश आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)