जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मारतळा शाळेत राष्ट्रीय भूगोल दिन साजरा ..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मारतळा दिनांक 14 जानेवारी दोन हजार बावीस मारतळा सध्या कोरणा च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत परंतु जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शिक्षण आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत शाळेचे उपक्रम शील शिक्षक रवी ढगे यांनी शिक्षण मित्र या संकल्पनेच्या आधारे गावातील श्री महर्षी वाल्मिकी ऋषी या सभागृहात वर्ग पाचवीचा वर्ग कोरणा चे नियम पाळून ऑफलाइन पद्धतीने दररोज दोन तास घेत आहेत यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यास मदत होत असल्याचे पालकांचे मत होत आहे.


आज राष्ट्रीय भूगोल दिन असल्याकारणाने भूगोल महर्षी डॉक्टर सी डी देशपांडे यांचा जन्मदिन भूगोल दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो याचे औचित्य साधून सर्व मुलांना भूगोल दिनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले व पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे त्या पद्धतीने मुलांना गोलाकार थांबून पृथ्वीचे फिरणे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले यामुळे मुलांना खूप आनंद वाटला शेवटी मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ घ्या गोड गोड बोला असा संदेश देऊन समारोप करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट मुगावे, बालाजी प्यारलावर, उपक्रमशील शिक्षक रवी ढगे विद्यार्थी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)