११ जानेवारीला ऐतिहासिक सामुहिक राष्ट्रगान साठी जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी.. नवा विक्रम करण्याचा संकल्प !

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( जिमाका ) :

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या 11 जानेवारी रोजी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सकाळी 11:11 मिनिटानी आयोजित केलेल्या ऐतिहासिक राष्ट्रगान साठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा प्रशासनाचे सर्व कार्यालय प्रमुख, तालुका पातळीवरील सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. 


नांदेड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थाचे विद्यार्थी नागरिक. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अभिवादन करण्यासाठी या राष्ट्रगीत व देशभक्ती गीत असलेल्या राष्ट्रगान कार्यक्रमात मोठ्या संख्येने उस्फुर्त सहभाग घेतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी व्यक्त केला. 


हा उपक्रम केवळ शासकीय आहे असे नव्हे तर यात अधिकाधिक स्थानिक नागरिक यांच्या लोकसहभागाला विशेष आमंत्रित म्हणून सहभागी केले जात आहे. सर्व विभागप्रमुख आपापल्या कार्यालयाशी संबंधित व्यक्तीचा यात सन्मानाने सहभागी होतील असे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी विभागप्रमुखांना दिले आहे. अत्यंत वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असलेला हा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाईल असेही ते म्हणाले.



मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदानावर..


दिनांक 11 जानेवारी रोजी 11:11 ला राष्ट्र गाना चा मुख्य कार्यक्रम नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित केला आहे. या समारंभास विशेष निमंत्रित व उत्स्फूर्त सहभाग घेणारे नागरिक निमंत्रित शालेय विद्यार्थी उपस्थित असतील. याबरोबरच पोलीस दलातील परेड पथक, स्काऊट , एनसीसी व नेहरू युवा केंद्र से संबंधित युवकांचा समावेश राहील.



शासनाच्या प्रत्येक कार्यालयासमोर होईल राष्ट्रगान..


नांदेड येथील प्रत्येक विभागाच्या जिल्हा कार्यालयासह वाडी-वस्ती तांड्यावरील ग्रामपंचायती पर्यंत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या कार्यास समोर उभे राहून 11 जानेवारी रोजी दिलेल्या वेळेत राष्ट्रगान सादर करतील. प्रत्येक कार्यालयाच्या ठिकाणी उस्फुर्त सहभाग होऊ इच्छिणार्या नागरिकांचे तेथे कार्यालय प्रमुख सन्मानाने नोंद घेऊन त्याचा सहभाग घेतील.




जिल्ह्यातील सर्व शाळा घेणार उस्फुर्त सहभाग..


नांदेड जिल्ह्यातील भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षाला केले जाणारे हे अभिनव अभिवादन असेल असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सामाजिक न्याय व इतर शासकीय उपक्रमांतर्गत असलेल्या सर्व शाळा विद्यालयाचे विद्यार्थी यात उत्स्फूर्त सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर खाजगी संस्थाही मोठ्या हिरीरीने पुढाकार घेत असून त्यांचा सहभाग हे याच उपक्रमाचा एक भाग राहील. प्रत्येक तालुका पातळीवर पंचायत समिती शिक्षण विभाग यात पुढाकार घेऊन 11 जानेवारी रोजी 11:11 मिनिटांनी सादर केलेल्या जाणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)