राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या बंद केलेल्या ज्यादा दोन वेतनवाढी पूर्ववत सुरु करावेत शालेय शिक्षण मंत्र्याकडे संघटनेची मागणी ..

शालेयवृत्त सेवा
0

 



दोन वर्षापासून थांबलेल्या राज्य पुरस्काराचे व्हावे वितरण !


हिंगोली ( शालेय वृत्तसेवा ) :

पुरस्कार प्राप्त शिक्षकांना इतर राज्याप्रमाणे सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शिक्षक संघटनेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रीय - राज्य शिक्षक पुरस्कार संघाचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर, जिल्हाध्यक्ष रमेश गंगावणे, संजय गिरी, शिवचरण पारटकर, पंडित आवचार, मारुती कोटकर, विनायक भोसले, गजानन पायघन, माधवी गुडेकर, रेणुका देशपांडे आदींनी निवेदन दिले आहे.



निवेदनात नमूद केले आहे की राज्यातील उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची पडताळणी करून दरवर्षी ५ सप्टेंबर ला शिक्षकदिनी राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना रोख एक लाख रुपये प्रशस्तीपत्र - प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जातो. केंद्र शासनातर्फे व राज्य शासनातर्फे शिक्षकांना पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या इतर राज्याप्रमाणे सोयी सुविधा मात्र देण्यात येत नाही त्यामुळे या शिक्षकांमध्ये नाराजी आहे.



राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या 2014 पासून बंद करण्यात आलेल्या दोन जादा वेतनवाढ पूर्ववत सुरू करावे. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नतीसाठी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा विचार करावा.  राज्यातील इतर पुरस्कारप्राप्त प्रमाणे बस व रेल्वेचे मोफत पास व कायमस्वरूपी ओळखपत्र देण्यात यावे. शासनाच्या व स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करणे आदी मागण्यांचा यात समावेश आहे. निवेदनावर सकारात्मक विचार करण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्र्याने केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)