पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण साहेब यांना पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड--पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री,ना.अशोकराव चव्हाण साहेब यांना पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने विद्यार्थी,शिक्षक व शाळांचे प्रश्न  सोडवण्यासाठी निवेदन नुकतेच देण्यात आले.


 100% शालेय विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शेष निधी मधून तात्काळ गणवेश उपलब्ध करून द्यावे. प्रलंबित निवड श्रेणी, वरीष्ठ वेतन श्रेणी तात्काळ देण्यात यावी.स्ट्रक्चर ऑडीटचे कारण सांगून अनेक वर्षापासून जिल्ह्यातील अत्यंत धोकादायक वर्गखोल्या पाडण्याचे प्रलंबित आहे. तात्काळ पाडण्यासंदर्भात आदेशित करावे.केंद्रप्रमुख व शि.वि.अ. यांचे पदे अभावीतने तात्काळ भरण्यात यावे. डिसीपीएसधारक शिक्षकांची स्लिप तात्काळ देण्यात यावी.


प्रत्येक शाळांना विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, स्वछतागृह जिल्हा परिषदमार्फत तातडीने देण्यात यावेत.केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक दोन्ही पदभार एकाच शिक्षकांना देऊ नये. दिलेला असेल तर तो तात्काळ काढण्यात यावा.चालू वर्षांची शिक्षकांची संच मान्यता तात्काळ करण्यात यावी.  केंद्रप्रमुख यांचा    एकसूत्री पदभार  जिल्ह्यात देण्यासाठी आदेशित करावे.विषय शिक्षकांना पदवीधरची वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. इयता पहिली ते आठवीच्या  विद्यार्थ्यांना कोविड लस तात्काळ उपलब्ध करून शाळा तात्काळ सुरु करण्यात यावे.पदोन्नत मुख्याध्यापक, विषय शिक्षक पदोन्नतीचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा. बदल्या संदर्भात सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी राज्य, जिल्हा प्रत्येकी 2-2 प्रतिनिधी बोलावून तात्काळ बैठक घेण्याचे आदेशित करावे.


निवेदनावर राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे , जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे ,जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, केशव कदम भोकर तालुकाध्यक्ष, गंगाप्रसाद समुद्रवाड तालुका सरचिटणीस सिध्दार्थ ढवळे तालुका कार्याध्यक्ष ,राज नामपल्ले तालुका कोषाध्यक्ष, गजानन तेलंग तालुका उपाध्यक्ष आदींच्या स्वाक्षरी आहेत.अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा माहुर तालुकाध्यक्ष एस एस पाटील , भोकर तालुका सरचिटणीस गंगाप्रसाद समुद्रवाड किनीकर यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)