संविधान वाचनाने प्रजासत्ताक दिन.. शाळेत उत्साहाने साजरा !

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( विशेष प्रतिनिधी) :

देशात कोरोनामुळे सावट असले तरी कोविड 19 आरोग्य विषयक सुचनांचे व नियमांचे पालन करून राज्यातील शाळांमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मुंबईतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज अंधेरी येथील निवासी शाळेत संविधानाचे वाचन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.


शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनामुळे निर्माण झालेले संकट दूर करण्यासाठी व जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, तसेच लसीकरणसाठी पालकांना व विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी शिक्षकांची भूमिका ही "फ्रन्ट लाईन वर्करची"आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री धर्मेंद्र द्विवेदी सरांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)