माधवराव पा.पांडागळे गुरुजींच्या स्मृरणार्थ केलेले कृतिशील अभिवादन सर्वांसाठी प्रेरणादायी -शिक्षक नेते मधुकर उन्हाळे

शालेयवृत्त सेवा
0

 


    शाळेतील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप


 नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

के.प्रा.शा.मारेगाव ता.किनवट येथे म.रा.शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे यांनी आपल्या वडिलांचा सहावा स्मृतिदिन इ.1ते 7 च्या प्रत्येक विद्यार्थ्यांना दप्तर,पेन,सावित्रीबाई फुले पुस्तक व भोजनदान देऊन अनोख्या पद्धतीने साजरा केला.हा समाज उपयोगी उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षकनेते मधुकर उन्हाळे यानी केले.

 

स्व.माधवराव रावण पाटील पांडागळे हे इ.स.1972 ते 1983 या कालावधीमधे के.प्रा.शा.मारेगाव (व) ता.किनवट येथे शिक्षक म्हणुन कार्यरत होते.प्रतीवर्षी त्यानी सेवा बजावलेल्या प्रत्येक गावातील जिल्हा परीषद शाळेच्या विदयार्थ्याना शैक्षणीक साहीत्य वाटप करून त्यांची पुण्यतीथी पांडागळे  परीवाराच्या वतीने साजरी केली जाते.ही खुप चांगली बाब आहे.असे मनोगत गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यानी व्यक्त केले.


 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते मधुकर उन्हाळे तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने,पं.स.सभापती दत्ता आडे,खा.हेमंत पाटील यांचे स्विय सहायक सुनिल गरड,पं.स.सदस्य निळकंठ कातले,माजी सभापती काशीनाथ कुडमेथे,शिक्षक परीषदेचे विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे,सहकारी पतपेढीचे चेअरमन अशोक पवळे,सचिव निळकंठ चोंडे,केंद्रप्रमुख विठ्ठल आचणे,प्रवक्ते राजेंद्र पाटील,कार्याध्यक्ष नरसिंग एंड्रलवार,जिल्हाउपाध्यक्ष रवि नेम्माणीवार,संतोष दासरवाड,यशवंत पतपेढीचे  संचालक धोंडीबा पांडागळे,तालुकाध्यक्ष शिवराज मुंडे,सरपंच गंगुबाई पेंदोर,शा.व्य.अध्यक्ष वामन पवार,घनश्याम किडे,सुभद्राबाई पाटील इ. उपस्थीत होते.



सुरूवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ व स्व.एम.आर पाटील पांडागळे यांच्या प्रतीमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.स्वागत गीत भाग्यश्री सातपुते, तृप्ती हसबे ,महिमा कोल्हे यांनी सादर केले.प्रास्ताविक दत्तप्रसाद पांडागळे,सूत्रसंचालन सुरेश पाटील तर आभार अदिती पांडागळे यानी मानले.

 


संजय कोठाळे,निळकंठ कातले,अशोक पा.पवळे, निळकंठ चोंडे,रवी नेमानीवार, यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी कर्त्तुत्ववान सावीत्रींच्या लेकींचा व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास ग्रामसेवक परमेश्वर पांडागळे,केंद्रप्रमुख विजय मडावी,मुख्याध्यापक रमेश खुपसे,संतोष गोरठेकर,प्रमोद ठोंबरे,बाबुराव पा.बेंद्रे,दिलीप पा.बेंद्रे,सौ.विजयालक्ष्मी किडे,श्रीमती मंगल लंगडे,सौ.वर्षाराणी सोनटक्के,सौ.अर्चना पांडागळे,सौ.वैशाली पांडागळे,सहशिक्षक अश्वत घुले,ब्रम्हसिंग राठोड,दत्ता पेटकुले,यासह अनेक गावकरी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)