ना.वर्षाताई गायकवाड शिक्षणमंत्री यांना महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे निवेदन

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने ना. वर्षाताई गायकवाड शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना नुकतेच  नांदेड येथे देण्यात आले .यात विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या  सोडविण्याची मागणी करण्यात आली.विद्यार्थ्यांची इ.5वी व इ.8 वी.शिष्यवृत्ती परिक्षा फीस सरसगट माफ करावी.नेट / सेट, पी.एच.डी. पात्रताधारक शिक्षकाप्रमाणेच एम.फील, एम.एड्. ,एम.ए. बी.एड्. पात्रताधारक शिक्षकांनावर्ग-1 व वर्ग-2 च्या जागेवर सामावून घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदाना आदेशीत करावे.  


विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मिळावी.मुलीचा उपस्थिती भत्ता 5/- रु. करण्यात यावा.वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण फीस 2000/- माफ करण्यात यावे.शिक्षण विस्तार अधिकारी 50 टक्के अट शिथील करुन शिक्षकांमधून पदे भरण्यात यावे.निवड श्रेणी राज्यातील सर्व शिक्षकांना मिळण्यासाठी सर्व जि.प.ना आदेशीत करावे.


राज्यातील सर्व जि.प.शाळेतील 100 टक्के विद्यार्थ्यांना मोफत व गणवेश देण्यात यावेत.निवेदनावर स्वाक्षरी राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे,अशोक मोरे जिल्हाध्यक्ष, बाबुराव माडगे जिल्हा सरचिटणीस, बळीराम फाजगे जिल्हाकोषाध्यक्ष, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे, जिल्हा मुख्य संघटक जे डी कदम, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख एस एस पाटील,जिल्हा सहसचिव विलास नाईक यांनी दिली आहेे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)