10 जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळा बंद -जिल्हाधिकारी विपीन इटणकर !

शालेयवृत्त सेवा
0

 




9 ते 12 वी चे वर्ग मात्र सुरू.. 1 ते 8 वर्ग ऑनलाईन !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यामध्ये शासन परिपत्रकानुसार इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग 1 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु कोविड विषाणूचा नवीन व्हेरीएंट मायक्रॉनचा वेगाने होत असलेला प्रसार व जिल्ह्यामध्ये या विषाणूचा शिरकाव झालेला निर्दशनास आलेला आहे. यासाठी या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्या आर्थि आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये प्राप्त अधिकारानुसार नांदेड जिल्हा क्षेत्रांमध्ये व कोविड - 19 या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवी चे सर्व वर्ग दिनांक 30 जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद राहतील. परंतु ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांचे अध्यापन सुरू राहील. इयत्ता 9 ते 12 चे वर्ग कोरणा विषयक नियमाचे पालन करून प्रत्यक्ष सुरू राहतील. तसेच रुग्ण आढळून आल्यास तात्काळ शाळा बंद करून आवश्यक त्या उपाययोजना करतील. शिक्षकाने कोविड काळात शाळेत उपस्थित राहून ऑनलाइन शिक्षण विषयक कामकाज पाहतील. असे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी काढले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)