नांदेड जिल्ह्यातील पाचवीपासून च्या शाळा सोमवारी तर सात फेब्रुवारी पासून पहिली पासूनच्या शाळा सुरू होणार..

शालेयवृत्त सेवा
0

 


जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी काढलेले परिपत्रक 



नांदेड : जिल्ह्यातील covid-19 ची परिस्थिती पाहता दिनांक 31 जानेवारी 2022 पासून नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या तसेच दिनांक 7 फेब्रुवारी 2022 पासून इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.



उपरोक्त दिनांक 20 जानेवारी 2022 च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना तसेच शासनाने वेळोवेळी संदर्भातील परिपत्रकान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच 15 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख डॉक्टर विपिन इटणकर यांनी काढले आहे.



यापूर्वीच 24 जानेवारी 2022 पासून नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापकांच्या इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)