लोकशाही दिनाच्यानिमित्ताने मतदार जनजागृतीसाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले साहित्य पाहून जिल्हाधिकारी गेले भारावून !

शालेयवृत्त सेवा
0

                      



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वर्ग पाचवीच्या मुलांनी लोकशाही दिना निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ विपन इटनकर यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून संकल्पपत्र संकल्प माझा लोकशाही बळकटी चा या अनुषंगाने शाळेचे उपक्रम शील शिक्षक रवी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती साठी कार्डशिट चा व टाकाऊ वस्तूपासून सुंदर कलाकृती तयार केल्या होत्या त्या आज लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी डॉ विपिन सर यांना शाळेच्या मुलांच्या हस्ते देण्यात आल्या.


 ते सर्व साहित्य पाहून जिल्हाधिकारी महोदय भारावून गेले मुलांचे व शिक्षक रवी ढगे यांचे अभिनंदन केले तर  शिक्षण मित्र शाळा म्हणून  आमचे ढगे सर शाळा बंद असल्या तरी सकाळी ऑनलाइन तर शाळेत आल्यावर ऑफलाइन पद्धतीने नियमितपणे आमचा वर्ग कोरोना चे नियम पाळून गावातील समाज मंदिरामध्ये नियमितपणे घेत असल्याचे सांगितले असता. याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले व मुलांना सांगितले पुढील आठवड्यात तुमची सुद्धा शाळा सुरू करू असे आश्वासन दिले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच हे सर्व साहित्य मतदार दिनाच्या दिवशी प्रदर्शनासाठी ठेवण्यात  येईल. नंतर हे साहित्य निवडणूक आयोग मुंबई यांना पाठविणार असल्याचे सांगितले. यावेळी लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के, विषय तज्ञ सचिन किरवले, उपक्रमशील शिक्षक रवी ढगे ,विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)