जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा मारतळा शाळेतील मुलांना दिलेल्या आश्वासनाचे जिल्हाधिकारी डॉ विपिन यांच्याकडून पूर्तता

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मारतळा दिनांक 30 जानेवारी 2020 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील वर्ग पाचवीच्या मुलांनी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती साठी तयार करण्यात आलेले साहित्य नुकतेच लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र सोनटक्के यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ विपिन सर यांना दिले त्यांनी मुलांशी संवाद साधताना पुढच्या आठवड्यात तुमच्या शाळा सुरू करू असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता म्हणून दिनांक 31 जानेवारी 2022 पासून नांदेड जिल्ह्यातील पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू करण्याचे तर वर्ग पहिली ते पाचवी चे वर्ग 7 फेब्रुवारी 2022 पासून सुरू करण्याचे पत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आश्वासन देऊन त्याची पूर्तता करणारे जिल्हाधिकारी डॉ विपिन सर यांचे शाळेच्या वतीने मुलांनी व शिक्षक गावकऱ्यांनी आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)