जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचा लेकींचा अभियानामध्ये संतोष सवडे यांनी नोंदवला सक्रिय सहभाग..

शालेयवृत्त सेवा
0

 



जालना ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक 3 जानेवारी ते दिनांक12 जानेवारी 2022 दरम्यान जिजाऊ ते सावित्री सन्मान -महाराष्ट्राच्या लेकींचा " अभियान राबवण्यात येत आहे . राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्री या महान स्त्रियांच्या  कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन ' जिजाऊ ते सावित्री' या स्त्री -सन्मान महामार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल करून सक्षम, स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याबद्दल    जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान 2022 अंतर्गत श्रीमती वर्षाताई गायकवाड, माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार आणि आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून सरस्वती भुवन शाळेचे शिक्षक संतोष सवडे यांनी महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या  महाराष्ट्राच्या लेकींचा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तर काही महिलांना ऑनलाईन सन्मानपत्र देऊन सामाजिक जबाबदारीतून उतराई होण्याचा  प्रयत्न केलाआहे. अभिनंदनीय उपक्रम राबवला आहे.  या अनोख्या उपक्रमाबद्दल संतोष सवडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)