जिल्ह्यांतर्गत बदल्या अशा होतिल..

शालेयवृत्त सेवा
0

 




[ जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हान्तर्गत बदल्यासाठी सुधारीत धोरण दिनांक 7 एप्रिल 2021 चा सारांश आणी बदल्याचे टप्पे थोडक्यात देत आहोत - संपादक ]


सुधारीत धोरणानूसार जि.प.शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या 2022 चे  टप्पे खालीलप्रमाणे -


◼️टप्पा क्रमांक 1 :-शाळानिहाय समानीकरना अंतर्गत रिक्त पदे ठरविणे..



◼️टप्पा क्रमांक 2:- विशेष संवर्ग 1 ची बदली :

विशेष संवर्ग 1 ची बदली प्रक्रिया राबविताना समानीकरना अंतर्गत ठेवलेली रिक्त पदे वगळून ,निव्वळ रिक्त पदे आणी बदलीस पात्र शिक्षकांची जागा यांची रिक्त जागा म्हणून यादी जाहीर केली जाईल.त्यानंतर संवर्ग 1 च्या बदली हवी असणाऱ्या शिक्षकांना 30 जागेच्या पसंतीक्रमासह फॉर्म  भरण्यासाठी 4 दिवसाचा कालावधी असेल.संवर्ग 1 चा शिक्षक हा बदलीसपात्र शिक्षक असेल तर त्याना बदलीसाठी फॉर्म भरणे आवश्यक असेल(नकार देण्याचा अधिकार आहे).बदलीस पात्र नसेल आणी बदली नको असेल तर फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.संवर्ग 1 च्या अनेक शिक्षकांचा बदली साठीचा पसंतीक्रम सारखाच असेल तर सेवाज्येष्ट शिक्षकांना त्या जागेसाठी प्राधान्य राहील,आणी सेवाज्येष्टता समान असेल तर वयाने ज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य राहील.त्यामुळे पसंतीक्रम काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.पसंतीक्रमनूसार शाळा देता आली नाही तर बदली होणार नाही.सदर सुधारित धोरणानूसार संवर्ग 1 च्या शिक्षकांनी एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर पुढील 3 वर्ष बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.


◼️टप्पा क्रमांक 3:- विशेष संवर्ग 2 बदली(अमप्राशिसं) :

संवर्ग 1 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुधारीत रिक्त जागेची यादी जाहीर करण्यात येईल त्यानंतर संवर्ग 2 च्या शिक्षकांना 30 जागेच्या पसंतीक्रमसह फॉर्म भरण्यासाठी 4 दिवसाचा कालावधी असेल.पति-पत्नी यांचे सध्याचे पदस्थापनेतील अंतर 30 किमी पेक्षा कमी असल्यास संवर्ग 2 चा दर्जा प्राप्त होणार नाही.संवर्ग 2 चा दर्जा प्राप्त झाल्यास दुसऱ्या जोडीदाराचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत असेल तर त्या यादीतून नाव कमी करण्यात येईल.दोघेही जि.प.कर्मचारी असतील तर एकानेच अर्ज करावा.अशाप्रकारे एकत्रीकरण झाल्यानंतर त्याना पुढील बदली देतांना एक एकक मानून देता येईल.अशावेळी त्यांना एकाच शाळेत दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी किंवा 30 किमी परिसरात रिक्त पदी बदली दिली जाईल.तसेंच एकत्रीकरण झाल्यानंतर पुढील बदलीसाठी विचार करतांना दोघांना पण एक एकक मानून दोघापैकी एकाची जर जिल्ह्यात सलग 10 वर्षाची व कार्यरत शाळेत 3 वर्षाची सेवा झाल्यास दोघांनाही बदलीस पात्र शिक्षक समजले जाईल.संवर्ग 2 च्या अंतर्गत बदली एकदा घेतल्यास पुढील 3 वर्ष बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.


◼️टप्पा क्रमांक 4:- बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली :

संवर्ग 2 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुधारीत रिक्त जागेची यादी जाहीर करण्यात येईल त्यानंतर अवघड क्षेत्रात (अवघड क्षेत्र जिल्हासमिती जाहीर करेल) किमान 3 वर्षाची सेवा झालेले बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना उपलब्ध असणाऱ्या जागेच्या पसंतीक्रमसह फॉर्म भरण्यासाठी 4 दिवसाचा कालावधी असेल.


◼️टप्पा क्रमांक 5:- बदलीस पात्र शिक्षकांची बदली :

बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया झाल्यानंतर सुधारीत रिक्त जागेची यादी जाहीर करण्यात येईल.दिनांक 31/5/2022 च्या संदर्भ दिनांकानूसार जिल्ह्यात 10 आणी सध्याच्या शाळेत 5 वर्षा किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षकाची यादी जाहीर करून रिक्त असलेल्या जागेच्या 30 किंवा ऊपलब्ध रिक्त जागेच्या संख्येनूसार पसंतीक्रमसह फॉर्म भरण्यासाठी 4 दिवसाचा कालावधी असेल.


◼️टप्पा क्रमांक 6:- विस्थापित शिक्षक बदली :

  बदलीस पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया आटोपल्यानंतर सुधारीत रिक्त जागेची यादी जाहीर करण्यात येईल.ज्याना टप्पा क्रमांक 5 मध्ये गावे मिळाली नाहीत अशा शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनूसार यादी जाहीर करण्यात येईल त्यानंतर त्याना रिक्त असलेल्या जागेच्या पसंतीक्रमसह फॉर्म भरण्यासाठी 4 दिवसाचा कालावधी असेल.सदर शिक्षकांना पसंतीक्रमातील जागा न मिळाल्यास किंवा त्यांनी फॉर्म न भरल्यास किंवा जागा रिक्त नसल्यास उपलब्ध होणाऱ्या जागेवर बदलीने नियुक्ती दिली जाईल.

(आपल्या माहीतीस्तव)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)