बार्टी, सारथी, महाज्योती स्वायत्त संस्थाच्या त्याच धर्तीवर तशाच पध्दतीने मुस्लिम समाजासाठी व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी भारत रत्न डॉ.ए.पी.जे कलाम संशोधन प्रशिक्षण केन्द्र आणि मानव विकास संस्था या नावाने स्वायत्त संस्था स्थापन करण्याची हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ची मांगणी...

शालेयवृत्त सेवा
0



महाराष्ट्र राज्य स्टेट वक्फ बोर्डाचे चेअरमन मा.डॉ. वजाहत मिर्झा साहेब यांना हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे साखडे..!


मा.डॉ.वजाहत मिर्झा साहेब अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट वक्फ बोर्ड यांचा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे सत्कार..!


औरंगाबाद-  बार्टी, सारथी, महाज्योती स्वायत्त संस्था च्या त्याच धर्तीवर तशाच पध्दतीने मुस्लिम समाजासाठी व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी भारत रत्न डॉ.ए.पी.जे कलाम संशोधन प्रशिक्षण केंद्र आणि मानव विकास संस्था या नावाने स्वायत्त संस्था स्थापन करण्याची हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ची मांगणी.महाराष्ट्र राज्य स्टेट वक्फ बोर्डाचे अध्यक्ष(चेअरमन)(मंत्री दर्जा) मा.डॉ.वजाहत मिर्झा साहेब औरंगाबाद च्या दौऱ्यावर आलेले असता त्यांची भेट लेमन ट्री या प्रसिद्ध हॉटेल मध्ये घेऊन व चर्चा करून त्यांच्याकडे सविस्तर माहिती म्हणजे पानांचे निवेदन सादर करण्यात आले.


हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे प्रथम फाऊंडेशन च्या परंपरा नुसार पुष्पगुच्छ ना देता पुस्तक शाल देऊन सत्कार करण्यात आले. तसेच अध्यक्ष साहेबांना विनंती करण्यात आली की मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व मोठे पाऊल उचलावे व मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम करावे. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही स्वायत्त संस्था उभारण्यात यावी कारण मुस्लिम समाजातील अनेक विद्यार्थी हुशार असतात परंतु आर्थिक परिस्थिती बिकट म्हणजे गरीब असल्याने ते पुढील शिक्षण ना घेता कामधंदा करण्यास प्रवृत होतात यामागचा एकच कारण म्हणजे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखाची असते म्हणून शिक्षणापासून वंचित राहतात म्हणून आपण सर्व बाबी आणि दिलेल्या निवेदनावर स्वतः लक्ष घालून त्वरित मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना व समाजाला न्याय देण्याचे काम करावे अशी विनंती हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी केली आहे. 


यावर अध्यक्ष(चेअरमन) साहेबांनी सांगितले की लवकरच मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून ही मांगणी करणार आहे व आपली मांगणी रास्त असल्याने त्वरित महाविकास आघाडी सरकार ठोस पाउल उचलतील असे विश्वास व्यक्त केले यावेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन, शेख मुजफ्फर भाई आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)