भरारी आत्मचरित्राचे प्रकाशन!

शालेयवृत्त सेवा
0

 




मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

माजी शिक्षणाधिकारी, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष  श्री ज. मो.अभ्यंकर यांनी लिहिलेल्या " भरारी "आत्मचरित्राचे प्रकाशन शुक्रवार दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. प्रकाशक मँजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशन केलेल्या या आत्मचरित्राचे प्रकाशन राज्याचे उद्योग व खानिकर्म आणि मराठी भाषा मंत्री  माननीय सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे .


यावेळी शिवसेनेचे खासदार विनायकराव राऊत, मुख्य माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य श्री. सुमित मलिक, प्रकाशक अशोक कोठावळे उपस्थित राहणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चर्चगेट ,मुंबई येथे होणाऱ्या सोहळ्यास कोविड 19 नियमांचे पालन करून उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)