स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षिका उषा नळगिरे यांची धडपड ...!!

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अर्धापुर तालुक्यातील पार्डी म .येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका उषा नळगिरे हे स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन मुलांच्या पाल्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे .पालकांना शाळेविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी पालकांचे समुपदेशन केले आहे .


नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वसमत फाट्याजवळ हंगामी स्थलांतरित कुटूंब पोटाची खळगी भरण्यासाठी काम मिळेल तेथे भटकंती करत असताना मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्रात बालरक्षक चळवळ सक्रिय सहभाग घेणाऱ्या शिक्षका उषा नळगिरे यांनी भटकंती करणाऱ्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाचे धडे दिले आणि शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे . 


उस्मानाबाद जिल्ह्यातील स्थलांतरित कुटुंबातील शर्या व प्रतीक या दोन मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे .तसेच मुलांना शैक्षणिक साहित्य दिले आहे आणि सर्व पालकांचे समुपदेशन करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले .यावेळी सर्व पालकांनी मुलांना शिक्षणासाठी आम्ही नेमही प्रयत्नात राहू असे आश्वासन दिले आहे .


मुलाच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य व इतर अत्यावश्यक वस्तू लवकरच स्वखर्चाने उपलब्ध करून देणार आहेत .बालरक्षक उषा नळगिरे यांचे बालरक्षक चळवळीत कार्य नेहमीच उल्लेखनीय असून नुकतेच त्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून मा .संचालक यांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळाले आहे .भटक्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या शिक्षिका म्हणून समाजात आपला एक आदर्श निर्माण केला आहे असे गटशिक्षणाधिकारी रुस्तुम ससाणे व केंद्रप्रमुख विकास चव्हाण यांनी सांगितले आणि उषा नळगिरे यांचे अभिनंदन केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)