देशभक्ती गीतगायन स्पर्धेत औरंगाबदचा दीपक सोनवने प्रथम तर लातूरची वर्षाराणी मुस्कावाड व्दितीय !
औरंगाबाद ( ग नू जाधव ) :
शिक्षक म्हटला म्हणजे प्रखर राष्ट्रभक्त हे समीकरण दृढ झालेले आहेच. जन्मदात्री माता, देव यापेक्षाही देशाला महत्त्व देणारे नागरिक ज्या देशात आहेत तो देश निश्चितच प्रगतीपथावर असतो आणि ज्या देशात देशाला महत्त्व देणारे शिक्षक असतात त्या देशाची भावी पिढी देशभक्त, संयमी आणि प्रगतीशिल घडत असते. असे प्रतिपादन अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे यांनी केले.
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ औरंगाबाद विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती गीत गायन स्पर्धेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपली अस्मिता, आपले अस्तित्व देशामुळेच असते म्हणून अखिल भारतीय शिक्षक साहित्य-कला-क्रीडा मंडळ राष्ट्रीय सणांना सर्वात जास्त महत्त्व देत असते. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी रोपाला पाणी घालून केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष शालिनी मेखा, राज्य सचिव विजय जोगमार्गे, राज्य तंत्रनिर्देशक अलंकार वारघडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख सचिन कुसनाळे, पुणे विभागाचे अध्यक्ष प्रकाश साखरे, अमरावती विभगाचे अध्यक्ष बाबाराव डोईजड, नागपूर विभागाचे अध्यक्ष किशोर चलाख, नाशिक विभागाचे अध्यक्ष जया नेरे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
औरंगाबाद, परभणी, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली या जिह्यातील महानंदा चिभडे - बुरकुले ( नांदेड ), रेश्मा विष्णू देवढे ( औरंगाबाद ), अंबादास जैनाजी इंगोले ( हिंगोली ), ज्योती केशवराव इंगोले (परभणी), वर्षाराणी ज्ञानोबा मुस्कावाड ( लातूर ), रामस्वरूप लक्ष्मण मडावी ( नांदेड ), दिपक आसाराम सोनवणे (औरंगाबाद), पांडूरंग आश्रुबा केंद्रे ( बीड ), अमृतराव जोगदंड ( नांदेड ), मनिषा हरिबा ढवळे ( नांदेड ) यांनी सहभाग नोंदवला होता.
विभागीय परिक्षक तथा संगित विशारद सुरेश पाटील यांनी परिक्षण करून पुढील प्रमाणे विजेते घोषित केले. देशभक्ती गीत गायन स्पर्धेत प्रथम - दीपक आसाराम सोनवणे, व्दितीय - वर्षाराणी ज्ञानोबा मुस्कावाड, तृतीय - अंबादास जैनाजी इंगोले, चतुर्थ - रेश्मा विष्णू देवडे, पंचम - मनीषा हरिबा ढवळे, आणि सहाव्या क्रमांक भगवान अमृतराव जोगदंड यांना मिळाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदेडचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केले तर आभार तंत्रस्नेही शिक्षक रुपेश मुनेश्वर यांनी मानले. झूमवर झालेल्या या कार्यक्रमास बहुसंख्य श्रोते ऑनलाईन उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .