औरंगाबाद (प्रतिनिधी) :
आखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने औरंगाबाद विभागातील शिक्षकांना प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे ' समाजमित्र ' पुरस्कार देण्यात येणार आहे.
कोरोना काळात जे कोविडचे काम केलेले शिक्षक आहेत त्यांनी स्वतःच्या पूर्णपरिचयासह प्रस्ताव 7588424735 या व्हाटस ॲप नंबर पाठऊ शकता.
एक ''समाजमित्र' व उर्वरीतांना 'कोविड योद्धा ' म्हणून आखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 'प्रमाणपत्र ' देऊन गौरविण्यात येईल. तरी इच्छूकांनी ४ ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर आणि विभागीय परिक्षण प्रमुख सुरेश पाटील यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .