हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन वार्षिक सभा खेळी मेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न... शैक्षणिक उपक्रम राबविणार !

शालेयवृत्त सेवा
0

 



राज्य उपाध्यक्ष पदी शफीक पठाण, राज्य कार्याध्यक्ष पदी अरशद पठाण तसेच राज्य संघटक पदी अमोल कुलकर्णी व महिला विंग च्या राज्याध्यक्षा पदी सुनेहरा बेगम सरफराज शेख यांची निवड!


सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे जँगी सत्कार!


कोकण(चिपळूण) रिलीफ फँड मध्ये हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन कार्यालयात शैक्षणिक  साहित्य जमा करण्याचे आवाहन- शेख अब्दुल रहीम


औरंगाबाद-  हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन ची वार्षिक सभा 08 ऑगस्ट रविवारी रोजी औरंगाबाद येथे कार्यालयात कायदेशीक सल्लागार ऍडवोकेट इरफान खान यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.फुरकान दिवाण व प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांची होती. खेळी मेळीच्या वातावरनात उत्साहात संपन्न झाली. 


शेख अब्दुल रहीम सरांनी सर्वांना पहिल्यादा फॉउंडेशन चे उद्देश आणि कार्य सांगितले नंतर सर्वानुमते प्रामुख्याने नवीन राज्य व जिल्हा  कार्यकरिणी ची निवड करण्यात आली. सर्व प्रथम कोकण (चिपळूण ) येथे आलेल्या महापुरात झालेल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली व कोकण रिलीफ फँड जमा करून लवकरात लवकर मदत पुरविण्यात येईल तसेच हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे आवाहन करण्यात येणार आहे की पुस्तक, वही रजिस्टर शाळा साहित्य जमा करावे. या नंतर चालू शैक्षणिक वर्षात सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 7 नोव्हेंबर  डिसेंबर 2021 रोजी ऑफलाईन घेण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला तसेच बाकी सर्व उपक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन घेण्यात येणार आहे यात विद्यार्थी साठी शुद्ध लेखन स्पर्धा आणि प्रेरणा वाचन दिन येत्या 15 ऑक्टोबर रोजी डॉ.ए पी जे कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.


   1 डिसेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांच्या वाढदिवसानिमित्  औरंगाबाद येथील अनाथ आश्रम मध्ये जेवणाची व्यवस्था तसेच फॉउंडेशन च्या वर्धापन दिन आणि भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर आणि बिस्कीट आणि फळे वाटप कार्यक्रम अश्या अनेक कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल कोरोनाची परिस्थिती पाहून घेण्यात येईल असे चर्चा करून सर्वानुमते ठराव घेण्यात आले.तसेच या कार्यक्रमा साठी काही सूचना आणि मार्गदर्शन  शेख अब्दुल रहीम सर , डॉ. फुरकान दिवाण, शफीक पठाण सर, तसेच अध्यक्षणीय भाषण ऍड. इरफान खान यांनी केले. 


नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष शफीक पठाण तर राज्य कार्याध्यक्ष पदी अरशद पठाण सर , राज्य प्रसिध्दी(मीडिया) प्रमुख आजम पठाण यांची तर कोषाध्यक्ष पदी शेख शकुर यांची तर राज्य संघटक पदी अमोल कुलकर्णी तसेच औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी सय्यद ताजीमोद्दीन तर सचिव पदी शेख यासेर यांची निवड करण्यात आली तसेच सिल्लोड  तालुका कार्यकारिणी मध्ये थोडा फार बदल करून तालुका अध्यक्षपदी शेख जफर शेख बुढण तर  तालुका सचिव पदी शेख इलियास शेख खालेक यांची तर  शहराध्यक्ष जुनेद कुरैशी यांची निवड एकमताने करण्यात आली तसेच याच बरोबर महिला बघिणी आणि शिक्षिकांच्या आग्रह खातर महिला राज्यकार्यकरिणी गठीत करण्यात आली यात प्रथमच महिला राज्याध्यक्षा म्हणून मुंबई येथील शिक्षिका सुनेहरा बेगम सरफराज तर राज्य उपाध्यक्षा औरंगाबाद येथील शिक्षिका गुलनार तहसीलदार व राज्य सरचिटणीस शाहीन नाज यांची निवड कोर कमिटी च्या एकमताने निवड करण्यात आली. तसेच परभणी च्या जिल्हाध्यक्ष पदी अजीम अहेमद खान तर लातूर जिल्हाध्यक्ष पदी जावेद बाबूलाल शेख यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली. 


बाहेर च्या जिल्हयातील सदस्यांनी झूम मीटिंग द्वारे आपली उपस्थिती दर्शवली. सर्वाना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित वखार्ड संशोधन केंद्राचे जेष्ठ वैज्ञानिक डॉ. फुरकान दिवाण, संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, कायदेशीर सल्लागार एड.इरफान खान यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचे जँगी सत्कार करण्यात आले त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवर व सदस्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.शेवटी संस्थापक सदस्य शाहरुख पठाण यांच्या आभार प्रदशनानंतर सभा संपन्न झाली.


 या कार्यक्रमासाठी संस्थापक सचिव शेख शब्बीर ,तालुका अध्यक्ष शेख जफर, नजीर पठाण ,शेख शकुर ,राज्य सह सचिव शेख साबीर , जुनेद कुरेशी , शेख समीर ,शेख इसाक, महिला प्रतिनिधी मध्ये शाहीन नाज, सुमय्या शाहरुख,  आदींची उपस्थिती होती तसेच नवनियुक्त महिला राज्याध्यक्षा शेख सूनहेरा सरफराज , नवनियुक्त मराठवाडा अध्यक्ष डॉ. सोहेल नवाब, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन, परभणी नवनिर्वाचित नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अजीम अहेमद खान, लातूर चे नवनिर्वाचित व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष जावेद बाबूलाल शेख, शेक रहीम (अरमान), शेख वसीम, सलमान शाह, पठाण अनिस, हिना खान आदींची झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)