घरो घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे .. !

शालेयवृत्त सेवा
0

 




पार्डीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम सुरू ; विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचा प्रयत्न .....!!!


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

कोरोनामुळे जिल्हा परिषद शाळा आणखी बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये . यासाठी अर्धापुर तालुक्यातील पार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शिक्षिका उषा नळगिरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम सुरू केले आहे .या उपक्रमामुळे विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहिले आहेत .


मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा उघडल्या नाहीत अनेक शाळानी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला परंतु ग्रामीण भागातील काही पाल्याची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना महागडे मोबाईल घेणे शक्य नसल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका उषा नळगिरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या घरोघरी शाळा हा उपक्रम सुरू केला यामध्ये कोरोना काळात घालून दिलेल्या  नियमांचे पालन करून एका शिक्षकांनी दहा विद्यार्थ्यांचे गट त्यांना एक ते दोन तास शिकवणी वर्ग घेतले जात आहे .


या उपक्रमामुळे शाळेतील सर्वच विद्यार्थी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात कायम राहिले आहेत .या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सहज शिक्षण घेणे शक्य झाले आहे .शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असल्याने पालक समाधान व्यक्त करीत आहेत .या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेश देशमुख ,सहशिक्षक नामदेव भोसले ,रमेश पावडे , योगाची कल्याणकर ,शोभा देशमुख ,मंगला सलामे अखंड परिश्रम आहेत .रुस्तुमे ससाणे गटशिक्षणाधिकारी , कोढेकर मॅडम शिक्षणविस्ताराधिकारी , केंद्रप्रमुख विकास चव्हाण यांनी शाळेच्या अभिनव उपक्रमाबद्दल अभिनंदन केले आहे . 


ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी शक्य नसल्याने आम्ही आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या घरी जाऊन मूलभूत संकल्पना शिकविण्याचे काम करीत आहेत .या उपक्रमात विद्यार्थ्यांच्याही प्रतिसाद मिळत आहे .

- उषा नळगिरे 

शिक्षिका जि .प .प्रा .शाळा .पार्डी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)