मुंबई ( ज्योती राणे ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ कोकण विभाग आयोजित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा 2021 स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाने ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. यात मुंबई मुंबई उपनगर ,ठाणे ,पालघर, रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून एकूण ३० स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ कोकण विभाग अध्यक्षा मा. हर्षलताई साबळे यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात दिपप्रज्वलन संपन्न होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अथस्वागतम शुभ स्वागतम हे स्वागतगीत स्नेहा केसरकर यांनी सादर करून सांगीतिक वातावरण निर्माण केले. शिक्षकांनी सादर केलेल्या सुंदर सुंदर अप्रतिम गायनाचे परीक्षण परीक्षक सुजाता जाधव , स्नेहा केसरकर , शालिनी मेखा , वर्षा गायकवाड आणि सरला येवले यांची यांनी केले.
ठाणे जिल्हाध्यक्ष विद्याताई शिर्के यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून शब्द सुमनांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष मुंबई उपनगर माननीय मिताली ताई तांबे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून आणि देशभक्तीपर गीतांचे योगदान स्पष्ट करून केले संस्थापक राज्याध्यक्ष अभाशिसाकक्री मंडळ मा नटराज मोरे सर यांनी कार्यक्रमासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन पर शुभेच्छा सर्वांना दिल्या. कार्यक्रमात राज्य प्रसिद्धीप्रमुख मा सचिन कुसनाळे सर यांनी आपल्या मनोगतातून अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ यांचे कार्य कशा पद्धतीने सुरू आहे त्यात शिक्षक कशाप्रकारे सहभागी होऊ शकतात यांचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राज्य सचिव मा जोगमार्गे सर राज्य उपाध्यक्ष मा शालिनीताई मेखा ,पुणे विभाग प्रमुख मा प्रकाश साखरे, अमरावती विभाग प्रमुख मा श्री बाबाराव डोईजड, नागपूर विभाग प्रमुख मा किशोर चलाख सर, नाशिक विभाग प्रमुख माननीय जया ताई मेरे औरंगाबाद विभाग प्रमुख माननीय रमेश मुनेश्वर तसेच सर्व विभागीय अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक कार्य सोबत आपल्या गायनाचा छंद जोपासून सुंदर सुंदर देशभक्तीपर गीत सादर करून देशभक्तीपर वातावरण निर्माण करून सर्वांची दाद मिळविली. परीक्षक मा शालिनीताई मेखा तसेच परीक्षक मा सरला येवले यांनी मनोगतातून संगीत विषयी तसेच स्वर ताल लय यावरची पकड याविषयी मार्गदर्शन केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा हर्षलताई साबळे आणि परीक्षक मा सुजाता जाधव यांनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे विजेते घोषित केले यामध्ये कोकण विभागातून एकूण 6 क्रमांक काढण्यात आले. त्यात प्रथम श्री.विनोद शिंदे (विकास हायस्कुल जुनियर कॉलेज, विक्रोळी जि.मुंबई )द्वितीय श्री दिपकअरुण बागुल (जि.प.शाळा चिंचघर, तालुका मंडणगड जि.रत्नागिरी तृतीय श्री.गोविंद मधुकर मुंढे जि. प.शाळा सडे जाधववाडी, जि. रत्नागिरी चतुर्थ
श्री. दिलीपकुमार श्रीराम मराठे (जि. प.शाळा गोठेबोरखत क्र.1 तालुका मंडणगड जि.रत्नागिरी) पंचम श्री.योगेश नारायण कुमावत (जि.प.शाळा रणकोळ, पारधी पाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर) आणि सहाव्या क्रमांकाने श्रीम.ममता महेंद्र गोतारणे (जि.प.धोदडेपाडा तालुका विक्रमगड जि.पालघर ) यांची निवड होऊन विजेते ठरले. सर्व विभागातून अंतिम फेरी देखील या स्पर्धेची होणार असून निवड झालेल्या शिक्षकांनी त्या दृष्टीने तयारी करावी असे अध्यक्षीय मनोगतातून हर्षलताई साबळे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे तंत्रनिर्देशक म्हणून मिताली तांबे, अलंकार वारघडे आणि ओंकार भोई यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिर्के आणि ज्योती राणे यांनी करून तब्बल ५ तास सर्वांना खिळवून सर्व रसिक श्रोत्यांची दाद मिळविली. कार्यक्रमाचे आभार सुजाता जाधव यांनी व्यक्त केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .