नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मारतळा दि 15 ऑगस्ट 2021 स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीयासाठी उत्साहाचा दिवस असतो. यावर्षी भारतानं स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारत सरकार यंदा स्वातंत्र्य दिनी काहीतरी स्पेशल करण्याची तयारी करत असून . सरकारने यावर्षी स्वातंत्र्य दिन अमृत दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्याचसोबत सरकारने लोकांना विशेष राष्ट्रगीत गातानाचा एक व्हिडिओ शेअर करण्याचं आवाहन देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हे सर्व विडिओ स्वातंत्र्य दिनी प्रसारित करण्यात येणार आहे.
हा उपक्रम घेण्यामागे उद्दिष्ट आहे की, भलेही कोरोना महामारीमुळे अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. लोकं समुहाने एकमेकांना भेटू शकत नाहीत. सोशल डिस्टेसिंगचे पालन गरजेचे आहे. परंतु स्वातंत्र्य दिनाचा उत्साह भारतीयांच्या मनात कायम आहे. त्यामुळे त्याच उत्साहात आपण हटके पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे. यावेळी बहुतांश स्वातंत्र्य दिन कार्यक्रम ऑनलाइन माध्यमातून केले जातील. त्यामुळे भारतासाठी सर्वात मोठा दिवस जास्तीत जास्त लोकांच्या सहभागाने साजरा केला जाणार आहे.
तसेच सद्या शाळा बंद पण शिक्षण सुरू अंतर्गत सर्व मुलांना या उपक्रमाबद्दल माहिती देउन प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी या उपक्रमात स्वतः सहभागी होऊन वर्ग 5 वीच्या सर्व मुलांना सहभागी करून घेतले यात सहभागी मुलांना ऑनलाईन पध्दतीने प्रमाणपत्र उपलब्ध झाले. ढगे सरांनी स्वतः या सर्व प्रमाणपत्राच्या प्रिंट उपलब्ध करून स्वातंत्र्य दिनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनुरथ पाटील ढगे, मनोहर पाटील ,भास्कर पाटील ढगे, सरपंच बालाजी बीच्चेवाड, ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन सर्व सदस्य तसेच केंद्रप्रमुख टी पी पाटील, मु अ आनंद दरेंगावे ,मुकदम चापेवार व प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते देऊन मुलांचा सत्कार करण्यात येणार आला या सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मुलांमध्ये देश प्रेम ही भावना वाढविण्यासाठी मदत होणार असल्याने पालकांनी व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .