अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ नागपूर विभागाच्या वतीने ऑनलाईन गीतगायन स्पर्धा संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिक्षकांसाठी काव्यमय मेजवानीचे आयोजन..!


नागपूर ( किशोर चलाख ) :

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ नागपूर विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नागपूर विभागातील शिक्षकांसाठी गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा पार पडली.


सदर गीतगायन स्पर्धेत नागपूर विभागातील नागपूर, वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील कार्यरत शिक्षक-शिक्षिकानी सहभाग घेतला.ऑनलाईन गीतगायन स्पर्धेत अध्यक्ष म्हणून राज्याध्यक्ष श्री.नटराज मोरे,तर उदघाटक म्हणून  नागपूर विभाग अध्यक्ष किशोर चलाख उपस्थित होते.


सदर स्पर्धेत श्री.सचिन कुसनाळे(राज्य प्रसिद्धी प्रमुख),सौ.शालिनी मेखा(राज्य उपाध्यक्षा),श्री.अलंकार वरघडे( राज्य तांत्रिक प्रमुख)यांचे मार्गदर्शन लाभले.सदर ऑनलाईन गीतगायन स्पर्धेत दिवाकर मादेशी (गडचिरोली),रजनी सलामे(गडचिरोली),अर्चना मेहेर (चंद्रपूर),सुधीर खोब्रागडे,अस्मिता खोब्रागडे,आशा पोहनकर, संदीप मेश्राम, मनोज गेडाम(सर्व गोंदिया) यांनी बहारदार गीतांचे सादरीकरण केले. सदर स्पर्धेत सूत्रसंचालन मुरलीधर खोटेले यांनी तर परिक्षकाची भूमिका गंगाधर येवले व गोपाल विरूलकर यांनी पार पाडली.आभार प्रदर्शन किशोर चलाख यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी किशोर चलाख,मुरलीधर खोटेले,गंगाधर येवले यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)