नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
रिलायन्स फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत कार्यालय जवळा (दे) यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील 110 बालकांना मास्कचे वाटप करून 75व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच कमलबाई साहेबराव शिखरे, ग्रामसेवक अंबुलगेकर, ग्रा प सदस्य डॉ सुजाता गोडबोले, सिंधूताई पांचाळ, बाबुराव गवळी, रतन टीमके, साहेब शिखरे, उपसरपंच प्र नारायण गवळी, माजी सरपंच कैलास गोडबोले, मा उपसरपंच माधवराव पावडे, राजेश पावडे, आनंद गोडबोले, मारुती चक्रधर ,मुख्याध्यापक ढवळे जी एस, संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार आदींची उपस्थिती होती.
रिलायन्स फाऊंडेशनचे नांदेड आणि हिंगोली कार्यक्रम प्रमुख दशरथ वाळवंटे यांच्या व ग्रामपंचायत कार्यालय जवळा (दे) यांच्या पुढाकारातून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रारंभी 110 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच कमलबाई शिखरे तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी एस यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण प्रारंभी करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा घेण्यात आली शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष आंबेकर यांच्या मनोगतनंतर प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपूर्ण झाला. यावेळी गावातील लहानथोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .